आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन जगणे कठीण आमुच्या वस्तीला
नको गरिबीचा खोटा उमाळा या वस्तीला।।
पाच वर्षांनी आठवता ना वस्तीला
निवडून येता विसरून जाता याच वस्तीला।।

भूलथापांनी बरबाद केले अमुच्या वस्तीला
गरिबी हटावचा खोटा नारा या वस्तीला।
पिण्यासाठी पाणी नाही, नळही नाही या वस्तीला
पाण्याच्या नळाची खोटी घोषणा याच वस्तीला।।


अंधाराचे साम्राज्य रात्री अमुच्या वस्तीला
घराघरात मोफत वीज हे अभिवचन या वस्तीला।
भिंतही पडते छप्परही गळते या वस्तीला
घरकुल घेऊ, निवारा देऊ, खोटं आश्वासन याच वस्तीला।।

विश्वासाने केले भकास आमच्या वस्तीला
भूलथापांनी केले कंगाल या वस्तीला।
पाच वर्षांनी दर्शन आपुले या वस्तीला
नको तुमचा खोटा दिलासा याच वस्तीला।।

आता हवाय आपला नेता आमुच्या वस्तीला
जनतेचे दु:ख सावरणारा नेता हवाय या वस्तीला।
पक्षापेक्षा कार्यकर्ताच चांगला हवाय या वस्तीला
हे सत्तासुंदरी असा तारणहार मिळेल का याच वस्तीला।।
हे सत्तासुंदरी असा तारणहार मिळेल का याच वस्तीला...