आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम, वात्सल्याची मूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण नोकरी केल्यास मुलांची आबाळ होईल या भावनेपोटी अनेक जणी नोकरी न करण्याचा किंवा असलेली नोकरी सोडण्याचा पर्याय स्वीकारतात. मात्र, आपल्याला जाणवत असलेलं शल्य किमान इतर महिलांच्या वाट्याला येऊ नये, या विचारातून दीपालीतार्इंनी पाळणाघराची सुरुवात केली. पाळणाघरामुळे दीपालीतार्इंचं शल्यही कमी झालं आणि नोकरदार आयांची काळजीही....

स्त्रीजीवनातील एक महत्त्वपूर्ण रूप म्हणजे आई筑. समाजात स्त्रीसोबत अनेक नाती बांधलेली असतात, पण आईची भूमिका तिच्या जीवनातील महत्त्वाची भूमिका असते. परंतु करिअर आणि मातृत्व या दोन्ही जबाबदार्‍या पार पाडताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. मुलांना सांभाळण्यासाठी घरात कुणी नसल्याने ज्या अनेक जणींना नोकरी करण्याची इच्छा पूर्ण करता येत नाही, त्यांच्यापैकीच एक दीपाली जोशी. पण ही समस्या इतर महिलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून दीपालीतार्इंनी 2009मध्ये पाळणाघर सुरू केले. पहिल्यापासून लहान मुलांचा लळा असल्यामुळे त्यांना हा निर्णय घेणे सोपे गेले. आपल्या मुलांबरोबर इतर मुलांनाही सांभाळता येईल आणि अर्थार्जनही होईल या उद्देशाने त्यांनी हे काम सुरू केले. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त चार मुले होती. आता त्यांच्याकडे दहा मुले आहेत.
दीपालीतार्इंकडे आईच्या नोकरीच्या वेळेनुसार मुले पाळणाघरात राहतात. सुरुवातीला अडचणी अर्थातच आल्या, पण हळूहळू सवय होत गेली. प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो. मुलांच्या स्वभावाबद्दल आईने सांगितले तर त्यांना सांभाळणे सोपे जाते असे त्यांच्या लक्षात आले. हळूहळू मुले चांगली राहायला लागली. सकाळी मुलांना वरणभात, दुपारी जेवण, सायंकाळी दूध, फलाहार देऊन दीपालीताई त्यांची आईसारखी काळजी घेतात. मुलांना गाणी ऐकवणे, गोष्टी सांगणे, विविध प्रकारचे खेळ यात त्यांचा दिवस कसा निघून जातो, ते त्यांना कळत नाही. मुलांच्या आवडीनिवडीची त्या काळजी घेतात. त्यांची शिस्त आणि प्रेमळ स्वभाव, खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे हे त्या चांगल्या प्रकारे करतात. मुलांचे दीपालीताईसोबत भावनिक नाते जुळले असून हे पाळणाघर न राहता गोकुळ बनलं आहे. आईच्या प्रेमाची उणीव त्या भासू देत नाहीत. त्यामुळे मुलांना तेथून घरी जावेसे वाटत नाही. मुलं आजारी असतील तर त्यांची विशेष काळजी घेतात. त्यांना वेळेवर खाणेपिणे, औषधोपचार करतात. त्यांच्या आवडीनिवडी जोपासल्याने मुले शांततेत राहतात.
त्या म्हणाल्या, दीड वर्षाचा तन्मय माझ्याकडे चांगल्या पद्धतीने राहायचा. संध्याकाळी आई घ्यायला आल्यावर तो घरी जायला नाही म्हणायचा.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा सविस्तर लेख..
(sulaxana.patil@dainikbhaskargroup.com)