आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड कॅन्सर डे : ३० ते ४५ वयोगटाला धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात होणार्‍या ९.५ दक्षलक्ष मृत्यूंपैकी ७ टक्के मृत्यू हे कर्करोगामुळे होत आहेत. कर्करोग हा जगासोबतच भारताला भेडसावणारी गंभीर समस्या बनत आहे. ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आहे. जनसामान्यांमध्ये कर्करोग व त्यामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलतर्फे उपक्रम राबवण्यात येत आहे.

एमजीएम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि इंड्स हेल्थ प्लस यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या अ‍ॅब्नॉर्मलिटी रिपोर्टमध्ये १४ टक्के स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर आहे, असे उघड करण्यात आले आहे.

या अहवालामध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांमध्ये पोटासंबंधी समस्या आढळून आल्या असून त्यापैकी १० ते १२ टक्के महिलांना सर्व्हायकल कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले. यामध्ये ३० ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांचा कर्करोगाचा टक्का अधिक आहे. पुरुषांच्या बाबतीत पण धोक्याचीच पातळी असून २२ टक्के पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाने पछाडले आहे. विशेष म्हणजे या कर्करोगाच्या लक्षणांची जाणीव पुरुषांना नसून वाढत्या वयामुळे असे होत असल्याचा संभ्रम पुरुषांमध्ये आढळून आला. ३५ ते ४५ वयोगटातील धूम्रपानाची आणि तंबाखू खाण्याची सवय असलेल्या ५५ ते ६० टक्के पुरुषांना तोंडाचा कर्करोग होण्याचे कारण अधिक आहे. ही चिंताजनक बाब असून ही धोक्याची सूचना आहे.

घ्यायची काळजी
- पूर्ण शरीराची वार्षिक नियमित तपासणी -रोज किमान ३० मिनिटे व्यायाम -हिरव्या पालेभाज्या,फळे व कोशिंबिरीचे आहारात प्रमाण वाढवावे -लाल मांस कमी प्रमाणात खाणे