आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणांचे बदलते रूप (सुनील देशमुख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैलांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी पोळा आजही ग्रामीण भागातून साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी शेतकरी बांधव बैलांना मारुती मंदिरात मिरवत आणतात. बैलांना फुगे, गोंडे, झुली, शिंगाला रंग असे सजवलेले असते. संध्याकाळी बैलांना पाहण्यासाठी व फोडलेल्या नारळाचा प्रसाद खाण्यासाठी लहान मुलांची गर्दी असते. मारुती मंदिराच्या पारावर कुणाचा बैल कसा सजवलाय, यावर जोरजोरात चर्चेचा फड रंगतो. वेगळाच जोश आबालवृद्धांमध्ये असतो. पूर्वी गायी-बैलांच्या पाठीवर कपिला, सर्जा-राजा असं लिहिलेलं असायचं. आता आर्ची, परश्या, सैराट असं लिहिलेलं दिसतं. सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धती काळानुरूप बदललेल्या दिसतात. पेपरमध्ये, सोशल मीडियावर शेतकरी नदी, विहिरीत, पाणी नसल्यामुळे वॉशिंग सेंटरवर घेऊन आल्याचे व शेतामध्ये पाण्याचे टँकर घेऊन बैलांना धुतानाचे फोटो पाहण्यात आले. आता बैलांचा पण सामुदायिक विवाह होतात. गाईंची संख्या घटली. परवाच्या पोळ्यात तर लग्नसोहळ्यात दहा बैलजोड्या व दोनच गाई, पाऊस तर आलाच नाही.

आता गणपतीसाठी मखर, कमानी, आकर्षक पडदे, खेळणी, दागिने, इतकंच काय फराळाचे पदार्थही तयार मिळतात. सण साजरे केलेले फोटो मोबाइलमुळे सगळ्यांना ताबडतोब पोहोचतात. केलेल्या कृतीची दाद लगेच मिळते! उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो.
बातम्या आणखी आहेत...