आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळे पैसे एकाच ठिकाणी नकोत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या लेखात आपण गुंतवणुकीच्या मुख्य उद्दिष्टांविषयी चर्चा केली, जसे की घर खरेदी, वाहन खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण/विवाह व निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन! ती साध्य करण्यासाठीचे पर्याय आता बघू या! सुरुवात आवडत्या बँक एफडीपासून. बँक एफडी, पोस्टाच्या विविध योजना, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), विमा (इन्शुरन्स), सोने-चांदी, प्लॉट, घर आणि शेअर्स व म्युच्युअल फंड!
शेअर्स आणि म्युच्युअल फंड एवढं नुसतं म्हटलं तरी मराठी माणसाला या थंडीच्या दिवसांतसुद्धा दरदरून घाम फुटतो. या गुंतवणुकीबद्दल अनेक गैरसमज आहेत. परंतु या लेखमालेद्वारे माझा आग्रह राहणार आहे म्युच्युअल फंडाचा! तुमची उद्दिष्टे काय हे वर लिहिले आहे. माझं मुख्य उद्दिष्ट आहे ही लेखमाला संपण्यापूर्वीच प्रत्येक मराठी माणसाची म्युच्युअल फंडात एक तरी, किमान एक हजार रुपयांची 15-20 वर्षांची मुदतीची एसआयपी सुरू करणे. अर्थात तुमच्या मनातील प्रश्न, गैरसमज आणि मुख्य म्हणजे भीती दूर करूनच! म्युच्युअल फंडावर लेखमाला सुरू होईल तेव्हा त्याबद्दल विस्ताराने बघूच.
आज बँक एफडी व पोस्टाचा विचार करू. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी अवधी असलेल्या उद्दिष्टांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. आज 9 ते 10% व्याजदर आहे. शक्यतो मुदत ठेव राष्ट्रीयीकृत बँकेतच ठेवावी. जास्त व्याज देणा-या संस्था टाळाव्यात. अनेक गुंतवणूकदार आपल्या नोकरी/व्यवसायात बिझी झाले आहेत. त्यांच्याजवळ वेळच नसतो. अशा लोकांचे लाखो-करोडो रुपये बँकेच्या बचत खात्यात पडून असतात. आम्ही त्याला झोपलेला पैसा (स्लीपिंग मनी) असे म्हणतो. तेव्हा असे करू नका. घरच्या महिलांनी या कामात पुढाकार घ्यावा व योग्य वेळी योग्य गुंतवणूक कशी होईल याकडे अवश्य लक्ष द्यावे. मुदत ठेवीमध्ये केवळ अशाच लोकांनी गुंतवणूक करावी ज्यांचे करपात्र उत्पन्न आयकर मर्यादेच्या आत आहे किंवा फार फार तर 10% आयकराच्या मर्यादेत आहे. सध्याची आयकराची मर्यादा सर्वसामान्यांसाठी दोन लाख रुपये, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अडीच लाख व 80 वर्षांवरील आजी-आजोबांसाठी पाच लाख रुपये आहे. 20 व 30% दराने आयकर भरणा-या व्यक्तीने कधीही बँकेत एफडी करू नये, कारण त्याला कधीही लाभ मिळणार नाही.
आज महागाई दराचा सरकारी आकडा 7% आहे, प्रत्यक्षात महागाई त्यापेक्षाही जास्त आहे हे आपण सर्व अनुभवतोच आहे. त्यावर 20 किंवा 30% आयकर म्हणजेच काहीही मिळणार नाही, केवळ एवढे समाधान की आपले भांडवल सुरक्षित आहे. 20 व 30% आयकर दात्यांसाठी अनेक पर्याय आहेत. ते पुढच्या लेखामध्ये येईलच. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्वच्या सर्व पैसा बँक/ पोस्टात गुंतवू नये. गुंतवणुकीचे इतर जे पर्याय आहेत त्यात थोडी का होईना, परंतु काहीना काही गुंतवणूक अवश्य करावी. प्रवासाला जाताना आपण सगळेच पैसे एकाच बॅगेत वा खिशात ठेवतो का? तसेच गुंतवणुकीचेसुद्धा आहे. सर्वच्या सर्व पैसा एकाच गुंतवणूक पर्यायात ठेवणे योग्य नव्हे. यात नुकसान आहे.
मुदत ठेवीसाठी मी एक पर्याय सुचवतो. एचडीएफसीमध्ये मुदत ठेवीचा. का? या संस्थेला मागील 15 वर्षांपासून एफएएए व एमएएएचे सर्वोच्च रेटिंग उफकरकछ व कउफअ या नामांकित संस्थांकडून मिळालेले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेसारखेच किंवा काकणभर चांगलेच व्याजाचे आकर्षक दर आणि सर्वात महत्त्वाचे बँकेच्या तुलनेतच नव्हे, तर अतिशय उत्तम, विनम्र व हसतमुख सेवा, भारतातील ज्या काही थोड्या संस्था चांगल्या सेवा देणा-या असतील त्यातील एक उत्तम कंपनी. 15ऌ/15ॠ, 16अ हे फॉर्म्स, वेळोवेळी मिळणारे व्याज आणि मुदतीअंती ठेव परत, हे सर्व वेळेच्या आत आणि ते पण घरपोच. आणखी काय हवे! तेव्हा मुदत ठेवीमधील काही पैसा एचडीएफसीच्या एफडीमध्ये अवश्य ठेवा. 15 महिन्यांसाठीच ठेवा व आपण स्वत: अनुभव घ्या.
हे करू नका
एकाच बँकेत सर्वच्या सर्व पैसा ठेवू नका. सर्टिफिकेटची संख्याही
खूप जास्त वाढवू नका. एका व्यक्तीने पाच हजार रुपये जमा झाले की कर एफडी असे करत करत शेकडो सर्टिफिकेट घेऊन ठेवले,
असेही करू नका. त्याचा हिशेब ठेवता ठेवता मुश्कील होऊन जाईल.
(वाचकांनी कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:च्या जबाबदारीवर करावी. कोणत्याही परिणामाला दै. दिव्य मराठी वा मधुरिमा जबाबदार नाही हे कृपया लक्षात ठेवावे.) - संपादक