आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Chitale\'s Article About Money Management After Retirement

निवृत्तीनंतरचा पैसा कुठे गुंतवाल ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थविषयक सल्ला देणा-या या सदरात आतापर्यंत कमावलेल्या पैशाच्या नियोजनाबद्दल जाणून घेतलं. आजच्या लेखात जाणून घेऊयात, निवृत्तीनंतरच्या पैशाच्या नियोजनाबद्दल.

म्युच्युअल फंड SIP विषयी आता तुमच्या मनात शंका नसतील अशी आशा करतो. ज्यांना आता SIP बद्दल शंका नाहीत त्यांनी आपली SIP सुरू केली का? SIP ही आजच्या काळाची गरज आहे, त्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंडाचा फंडा आणि SIP हे पूर्णपणे समजले असेल तर आपल्या पूर्ण क्षमतेने SIP सुरू करा. भीतभीत करू नका. तुमची क्षमता 10,000 रु. महिन्याची असेल तर 10,000 रु.चीच SIP अवश्य सुरू करा. भीतीपोटी 2000 रु.ची करू नका. पुन्हा एकदा सांगतो SIP चा आदर्श कालावधी 15 ते 35 वर्षे आहे. जितका जास्त कालावधी तितका तुमचा परतावा वाढत जाईल. चक्रवाढ व्याजाची जादू ही किमया करणार आहे. पैसे बुडण्याची शक्यता अजिबात नाही. पहिली 5 वर्षे मात्र रक्कम कमी-जास्त होत राहील. जेव्हा-जेव्हा कमी दिसेल तेव्हा अजिबात घाबरायचे नाही. उलट अशी संधी शोधून अशा वेळी त्याच योजनेत आणखी गुंतवणूक करावी. आंब्याचे झाड आठवते ना? तेव्हा तुमच्या पूर्ण क्षमतेने SIP सुरू करा, यामुळे तुमच्या मुलांची शिक्षण, लग्न व मुख्य म्हणजे तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य निश्चितपणे सुखकर होणार आहे.
आज आपण निवृत्तीनंतर मिळणा-या रकमेच्या गुंतवणुकीविषयी माहिती करून घेऊ. आज जी मंडळी सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी, रजेचे पैसे असेे बरेच पैसे मिळतात. आपण सरासरी उदाहरण म्हणून 20 लाख मिळतात असे गृहीत धरू. काय करतात ही मंडळी? सर्वसाधारणपणे चांगलं व्याज देणारी बँक शोधतात आणि FD करून धन्य होतात. काय मिळतं FD मध्ये? 10% व्याज, परंतु दरवर्षी 15G/15H किंवा 16A फॉर्म ची कटकट. आता या रिटायरमेंट फंडामधील अर्धी गुंतवणूक म्युच्युअल फंडात गुंतविली तर? बापरे! 10 लाख रु. म्युच्युअल फंडात? होय, काय हरकत आहे. उलट मी खालील उदाहरण देऊन सिद्ध करणार आहे की म्युच्युअल फंड गुंतवणूक ही सर्वोत्तम आहे.

अनिता यांनी 1994 साली निवृत्तीनंतर मिळालेले 20 लाख रु. बँकेच्या FD मध्ये ठेवले. आपण सरासरी 10% व्याज मिळाले असे गृहीत धरू.

गुंतवणूक मिळालेले व्याज
20 लाख रु. (1995) वार्षिक व्याज 10% दराने
200000 x 20 वर्षे = 40,00,000

एकूण 40 लाख व्याज मागील 20 वर्षात मिळाले व 20 लाख रुपये गुंतवणूक सुरक्षित.
विनीता यांनी 10 लाख रु. बँकेच्या FD मध्ये व 10 लाख रु. त्याच सुमारास HDFC म्युच्युअल फंडच्या इक्विटी फंडात गुंतविले. आता विनीता यांना प्रत्यक्षात काय मिळालेले आहे, हे आपण पाहू.
A बँकेत FD च्या माध्यमातून मिळालेले व्याज
गुंतवणूक मिळालेेले व्याज
10,00,000 रु. (1995) वार्षिक 10% दराने 1,00,000 x 20 वर्षे = 20,00,000
एकूण 20 लाख रु. व्याज व 10,00,000 रु. भांडवल
B इक्विटी फंड गुंतवणूक
गुंतवणूक - मिळालेला लाभांश
10 लाख रु. (1 जाने 1995)
1996 - 00
1997 - 00
1998 - 00
1999 - 360000
2000 - 470000
2001 - 0000
2002 - 120000
2003 - 200000
2004 - 400000
2005 - 300000
2006 - 500000
2007 - 500000
2008 - 550000
2009 - 300000
2010 - 400000
2011 - 400000
2012 - 400000
2013 - 400000
2014 - 400000
57,00,000

A - बँकेच्या 10 लाखांवरील व्याज 20,00,000
57,00,000
77,00,000

B - इक्विटी फंडाच्या 10 लाखांवरील लाभांश
अनिता यांना 20 लाखांच्या FD वर 20 वर्षांत 40 लाख रु. व्याज व मुदतीअंती 20 लाख रु. परत मिळतील.

विनीता यांना काय मिळाले?
10 लाखांच्या FD वर 20 लाख रु. व्याज, 10 लाखांच्या म्युच्युअल फंडावर 57 लाख रु. लाभांश म्हणजे एकूण सत्त्याहत्तर लाख रु. मंडळी एवढेच नाही, म्युच्युअल फंडावर इतका भरघोस लाभांश तर मिळणारच. परंतु म्युच्युअल फंडात जे 10 लाख रु. गुंतविले होते त्याची किंमतही आज 55 लाख रु. आहे. एकूण परतावा 21%. होय, एकवीस टक्के आणि तोसुद्धा संपूर्णपणे करमुक्त. त्यामुळे 15G-15H-16A पासून संपूर्ण मुक्ती.

आता मंडळी, तुम्ही काय करता हे बघा. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीची सुरुवातीची वर्षे बघा. 95 ते 98 लाभांश शून्य. बापरे! किती वाईट योजना चितळेंनी आपल्याला दिली आहे? लगेचच पैसे काढून चितळेला दहा शिव्या देऊन मोकळे. तेव्हा मंडळी असे करू नका. म्युच्युअल फंडला नीटपणे समजून घ्या. तुमचा पैसा कमी अवधीचा असेल म्हणजे 10-15 वर्षांपेक्षा कमी तर इक्विटी फंडाकडे बघूसुद्धा नका. बँक एके बँक चालू द्या. परंतु तुमचा पैसा 10-20 वर्षांचा आहे, तर बँकेकडे जाऊ नका. खात्रीने म्युच्युअल फंडात जास्त आिण करमुक्त परतावा िमळेल. आज परिस्थिती अशी आहे, की 58 किंवा 60 व्या वर्षी निवृत्त झालेली व्यक्ती एक तर वाटत नाही, की निवृत्त झाली म्हणून. म्हणजेच तब्येतीने ठणठणीत असतात. आज सर्वसाधारणपणे सरासरी आयुष्यमान हे 75-80 किंवा त्याहीपुढे जात आहे म्हणजे निवृत्तीनंतरचे 15-20 वर्षांचे किमान आयुष्य बहुतेकांना आहे. तेव्हा तुम्हालाच ठरवायचे आहे. अनिताच्या मागे जायचे की विनीताच्या.

म्युच्युअल फंडात पहिल्या 3 वर्षांत काहीच लाभांश मिळाला नाही. आम्हाला तर नियमित व्याज मिळायला पाहिजे. याला उत्तर आहे SWAP.Systematic Withdrawal Plan चा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे लाभांशावर अवलंबून न राहता दरमहा / तिमाही / वार्षिक जी आपली गरज असेल त्याप्रमाणे पैसे घेण्याची. हे सर्व समजून घेण्यासाठीच माझा आग्रह आहे, की आपला एक गुंतवणूक सल्लागार निवडा. नियमितपणे त्याच्या संपर्कात राहा व योग्य प्रकारे सर्व योजना- त्याचे फायदे-तोटे, धोके सर्व नीट समजून गुंतवणूक केली तर कायम विजयीच व्हाल.
sunilchitale16@yahoo.com