आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunila Buddhisagar Article About The Satyanarayan Pooja

कथा ऐका सत्यनारायणाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परागनं नेट कॅफेमध्ये स्वत:चं ईमेल पाहिलं. त्याला अपेक्षित असलेल्या जॉबची ऑफर आली होती. त्याला मनापासून आनंद झाला. कारण कामाचं स्वरूप त्याला हवं होतं तसं, आणि पगारही अपेक्षेप्रमाणे होता. ही बातमी घरच्यांना फोनने कळवण्यापेक्षा पेढे घेऊनच घरी जावं आणि त्यांना चकित करावं, असं त्यानं ठरवलं आणि तो उत्साहात निघाला.
वाटेत माणिकचंदशेटच्या दुकानावर जंगी रोशणाई केलेली दिसली. दारातला नोकर दुकानासमोरून येणा-या जाणा-या प्रत्येकाला ‘प्रसाद घेऊन जा’ असं मोठ्या अगत्यानं विनंतीपूर्वक सांगत होता. दुकानाला पाच वर्षं पूर्ण झाली म्हणून माणिकचंदनं सत्यनारायणाचा समारंभ (जाहिरातीच्या हेतूनं) केला होता. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची एक नवी आकर्षक स्कीमही जाहीर केली होती. पराग मनात उपहासानं हसला. माणिकचंदनं लबाडीनं बनावट माल अनेकांच्या गळ्यात घातल्याचं त्याला ठाऊक होतं. एकीकडे फसवणूक करायची आणि ‘सत्य’नारायणाचा भक्त असल्याचा देखावा करायचा, हे किती विसंगत होतं.
पराग घरापाशी पोहोचतो तोच शेजारच्या काकूंनी हाक मारून सांगितलं, ‘‘पराग, प्रसाद घेऊन जा हं. आमच्या अमेयला बारावीत छान यश मिळालं, म्हणून सत्यनारायण पूजा केली आहे.’’ परागला पुन्हा हे खटकलं.
अमेयची कॉपी करण्याची सवय, त्याच्या बाबांचं नोकरीच्या ठिकाणी ‘वरचे’ पैसे घेणं या गोष्टी त्याच्या कानावर विश्वसनीय लोकांकडून आल्या होत्या. घरात येऊन परागनं त्याला नोकरीची ऑफर आल्याचं सांगताच सगळे आनंदले. त्यानं आणलेल्या पेढ्यांचा आईनं आधी देवाला नैवेद्य दाखवला. परागनं देवासमोर हात जोडून म्हटलं, ‘‘या नोकरीच्या ठिकाणी मी मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करेन. तीच माझी सत्यानारायणाची खरी पूजा ठरेल.’’
sunila0810@gmail.com