आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी सुख अन् दु:खही महत्त्वाचे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्म हा शब्द संस्कृतमधील मूळच्या क्री या शब्दावरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ म्हणजे करणे किंवा सर्व क्रिया असा होतो. तांत्रिकदृष्ट्या या शब्दाचा अर्थ क्रियेचा परिणाम असाही होतो. काही वेळा त्याचा अर्थ आपल्या भूतकाळातील क्रियांचा परिणाम असाही
घेतला जातो. पण कर्मयोगानुसार कर्म याचा अर्थ काम असा होतो. सुख मिळविणे हे मानवाचे लक्ष्य नाही, तर ज्ञान संकलन हे मानवाचे महत्त्वाचे लक्ष्य आहे. आनंद आाणि सुख हे मिळते तसे नष्टही होते. ज्ञान मात्र कायम तुमच्यासोबत राहते. त्यामुळे सुख मिळवणे हे लक्ष्य समजणे ही मोठी चूक ठरू शकते.
जगात असणा-या सर्व दु:खांचे मूळ कारणही तेच आहे. आपण यशाचा मार्ग सुख हा समजत असतो; पण काही वेळानंतर ही गोष्ट आपल्या लक्षात येते की, ज्ञान हेच अधिक महत्त्वाचे असते. त्या दिशेने मार्गक्रमण करताना मग हेही लक्षात येते की, सुख आणि दु:ख हे दोन्ही महान शिक्षक असतात.
त्यामुळे जेवढे चांगल्याकडून शिकायला मिळते तेवढेच दुष्टांकडूनही शिकता येत असते. आत्म्याच्या आधी जेव्हा सुख आणि दु:खाच्या भावना नष्ट होतात तेव्हा उमटणा-या प्रतिक्रियांवरून माणसाचे व्यक्तिमत्त्व ठरत असते. कोणत्याही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करता त्याच्या मेंदूद्वारेच नियंत्रण केले जात असते. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा व्यक्तिमत्त्व घडवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळेच सुख आणि दु:ख हे दोन्हीही सर्वश्रेष्ठ गुरू असतात.