Home | Magazine | Pratima | swapnil joshi tv aritist marriage

स्वप्निल जोशीच्या खर्‍या लग्नाची दुसरी गोष्ट...!

अभिजित वाटेगावकर | Update - Jul 07, 2012, 10:03 AM IST

स्वप्निल जोशीने खासगी आयुष्यात दुसरा विवाह गेल्या वर्षी 16 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये केला. यामध्ये विशेष म्हणजे स्वप्निलच्या पहिल्या बायकोप्रमाणे त्याची दुसरी बायकोदेखील व्यवसायाने डेंटिस्ट आहे.

  • swapnil joshi tv aritist marriage

    सध्या छोट्या पडद्यावर घराघरात पोहोचलेल्या घनश्यामची म्हणजेच स्वप्निल जोशीची खासगी आयुष्यातदेखील दोन लग्ने झाली आहेत, हे फार कमी लोकांना माहिती असेल. पण ही वस्तुस्थिती आहे.‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये तो सध्या राधापासून (मुक्ता बर्वे) घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे त्याने खासगी आयुष्यात दुसरा विवाह गेल्या वर्षी 16 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये केला. यामध्ये विशेष म्हणजे स्वप्निलच्या पहिल्या बायकोप्रमाणे त्याची दुसरी बायकोदेखील व्यवसायाने डेंटिस्ट आहे.

    घना म्हणजेच स्वप्निल जोशीचा जन्म 1977 मध्ये मुंबईतील गिरगाव येथील लक्ष्मी चाळ येथे झाला. त्यानंतर वयाच्या 9 व्या वर्षीच स्वप्निलने त्याच्यातील अभिनेत्याचे दर्शन घडवले होते. 1986 मध्ये त्याने रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत कुशाची भूमिका केली होती. त्यानंतर सागर हे त्याच्या अभिनयाने प्रभावित झाले. त्यांनी त्याला 1993 मध्ये ‘कृष्णा’ मालिकेसाठी मुख्य भूमिकेत घेतले. स्वप्निलने नंतर शिक्षणाकडे लक्ष देत कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली. तसेच त्याने एल.एल. बी. देखील पूर्ण केले आहे. नंतर स्वप्निलने विविध हिंदी मालिकांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्याने हिंदी मालिकांबरोबर चित्रपट आणि मराठी मालिकांमधून आपले वेगळेपण जपले आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’मुळे आपल्यामध्ये खूप बदल झाल्याचे तो सांगतो. स्वप्निलच्या पहिल्या पत्नीचे नाव अर्पणा होते. तसेच त्याचे लव्ह मॅरेज होते. मात्र काही कारणामुळे त्यांनी घटस्फोट घेतला. त्याची दुसरी बायको ही औरंगाबादची रहिवासी असून तिचे नाव लीना आराध्ये असे आहे. स्वप्निलच्या पहिल्या बायकोप्रमाणे त्याची दुसरी बायको लीना हीदेखील व्यवसायाने डेंटिस्ट आहे. सध्या झी मराठी या वाहिनीवर सर्वात जास्त पाहिल्या जाणार्‍या मालिकांमध्ये ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेचा समावेश होत आहे. युवकांचे व्यासपीठ म्हटल्या जाणार्‍या फेसबुकवरून या बाबीची प्रचिती येते. कारण ही मालिका जेव्हापासून सुरू झाली, त्या वेळेसपासून फेसबुकच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’च्या पेजला आजवर 50 हजार जणांनी लाइक केले आहे. फेसबुकचा वापर अधिकाधिक तरुणच करतात. त्यामुळे तरुण वर्गात ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली आहे.
    केवळ आपल्या घरच्या लोकांसाठी विवाहबंधनात अडकलेले घनश्याम आणि राधा आता खरोखरच एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत. मात्र दोघेही कळूनसुद्धा न कळल्यासारखे वागत आहेत. आता राधाही खरोखरच घनश्यामच्या प्रेमात पडली आहे. तिने ही गोष्ट घनश्यामला सांगितली आहे. मात्र घनाच्या मनात असूनदेखील तो अमेरिका प्रेमामुळे त्याच्या खर्‍या प्रेमापासून दूर जाऊ पाहत आहे. या बाबीमुळे ही मालिका पाहणार्‍यांची उत्कंठा अधिक वाढत आहे. या मालिकेमध्ये प्रत्येक जण आपले प्रतिबिंब पाहत आहे. त्यामुळेच की काय, ही मालिका आबालवृद्धांची आवडती झाली आहे. आगामी काळात या मालिकेत बरेच काही घडण्याची शक्यता आहे. मालिकेतील सर्वांचा अभिनय दर्जेदार झाला आहे. एकंदरीत, स्वप्निलच्या खासगी आणि मालिकेच्या पात्रात काहीच फरक नाही.

Trending