आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसादाने विचारात पडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनीति जैन यांनी लिहिलेला ‘सखीच्या साथीने’ हा आमच्या वात्सल्य फाउंडेशनबद्दलचा लेख ‘मधुरिमा’च्या ३१ मेच्या अंकात प्रसिद्ध झाला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये तो पोहोचला. अनेक स्त्रियांनी तो आवडीने वाचला, याचे प्रमाण त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादातून मिळते.
दिवसभरात जवळजवळ २०० ते २५० फोन कॉल्स आले, शंभरहून अधिक ईमेल्सही आले. सर्वांना काम करायची इच्छा. माझ्याच हातावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना लगेच माहिती लिहून पाठवणे शक्य नव्हते. म्हणून मग जमेल त्यांच्याशी फोनवर गप्पा मारल्या. काही बायकांना काम करायचे आहे. पण मार्केटिंग तुम्ही करून द्या, असे त्यांचे सांगणे आहे. अनेक सैराट स्टाइल पळून गेलेल्या जोडप्यांना हे काम करून आयुष्य सावरायला मदत होईल, असे वाटते आहे. परंतु अनेक बायकांना घराबाहेर पडायची संधी आणि स्वातंत्र्य दोन्ही नाही. काहींनी तर दहा रुपयांसाठी नवऱ्याकडे हात पसरावा लागतो, असे सांगितले. या सर्वांच्या आशा आणि अपेक्षा कशा बरे पूर्ण करता येतील? या सगळ्यातून एक विदारक चित्र उभंं राहात आहे. लोकांना कामाची प्रचंड गरज आहे. काम करायची इच्छा आहे, पण योग्य मदत करायला कोणी नाही.
कामाची गरज असलेले अनेक फोन, पण योग्य रिसोर्सेस असणारे अधिकारी अथवा सशक्त संस्था यांच्याकडून नगण्य प्रतिसाद आल्याने मी थोडीशी विचारात पडले आहे. खरे तर या सर्व इच्छुक लोकांमध्ये आत्मविश्वास यावा म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी वर्कशॉप्स घेणे जरुरीचे आहे. म्हणजे योग्य व्यक्ती मिळतील आणि सक्षम प्रोजेक्ट्स उभे करता येतील.
या माध्यमातून एक निवेदन. सरकारी यंत्रणा अथवा मोठ्या संस्था जर मदत करतील तर अशी वर्कशॉप्स घेऊ या, ज्यातून सखी प्रोजेक्टची माहिती आणि उद्योग सांभाळायची तालीम अनेक बायकांना देता येईल. आम्ही जमेल तेवढे काम करण्यास उत्सुक आहोत, परंतु स्थानिक सहभागाची आणि मदतीची गरज आहे, बचत गट शोधणे, त्यांना एकत्र आणणे वगैरेसाठी. या एवढ्या काम शोधणाऱ्या लोकांची हाक ऐकणारं कोणीच नाही का?
(swatibedekar@gmail.com)