टॅब्लेटची संकल्पना / टॅब्लेटची संकल्पना

Jun 29,2012 09:39:47 PM IST

सध्या टॅब्लेट कॉम्प्युटर सर्वत्र चर्चेचा विषय आहे. भारतात सर्वात स्वस्त टॅब्लेट कॉम्प्युटरची निर्मिती झाल्यानंतर याची चर्चा वाढली आहे. चला तर मग टॅब्लेट कॉम्प्युटरची संकल्पना जाणून घेऊया - ‘टॅब्लेट’ शब्द याच आकारावरून ठरला आहे. टॅब्लेट कॉम्प्युटर हे वायरलेस उपकरण आहे, ज्यात कनेक्टिव्हिटीची व्यवस्था आहे. या कॉम्प्युटरमध्ये टच स्क्रीनचा वापर होतो. विंडोज किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. हा लॅपटॉपपेक्षा आकाराने छोटा आणि वजनाने हलका असतो. पण मोबाइल फोनपेक्षा थोडा जड असतो. याच्या स्क्रीनवर इलेक्ट्रॉनिक पेन्सिलने लिहिले जाऊ शकते. यात वेगळा की-बोर्ड लावलेला असतो. आता वेगळ्या प्रकारातही उपलब्ध आहे. अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टने ‘टॅब्लेट’ शब्द प्रसिद्ध करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 1971 मध्ये झेरॉक्स मशीन बनवणा-या एलन कंपनीने याचा प्रथम स्केच बनवला होता.

X