आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्षयाने भारतात सर्वाधिक मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताप्रमाणेच जगातील अनेक देशांना क्षयरोगाने ग्रासले आहे. दारिद्र्यता, अन्न अभाव, गोळ्या न मिळणे, शुद्धता-स्वच्छतेचा अभाव भारतात खूप आहे. समाजात क्षयासंबंधी जनजागृती होणे गरजेचे आहे. टीबी हे भारतातील लोकांना मृत्यूपर्यंत पोहोचवणारा प्रमुख रोग आहे. 2011 मध्ये जगामध्ये 8-7 मिलियन टीबीमुळे आजारी झाले व त्यातील 1.4 मिलियन मृत्युमुखी पडले. अज्ञान, गरीब लोकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. 15 ते 44 वर्षे वयाच्या स्त्रिया यातील स्त्री मृत्यूच्या प्रमाणात टीबी हे तिस-या स्थानी आहे. एचआयव्ही बाधित रुग्णांमध्ये टीबीचे प्रमाण जास्त असते. कारण, या रोगात प्रतिकार शक्ती अत्यंत खालवलेली असते. त्यामुळे क्षयरोगाची सर्व स्तरावर सर्व वयोगटात काळजी घेणे आवश्यक आहे.


टीबीचे कारण :
गरिबी, अस्वच्छता, जागोजागी थुंकणे, छोटा नॅपकिन तोंडाशी न धरणे, एकाच खोलीत रुग्णासहित अनेकांनी झोपणे, रुग्णांचे कपडे, रुमाल-टॉवेल अस्वछ असताना वापरणे, कोंदट खोलीत ऊन- प्रकाश येत नाही. त्यातच राहाण्याची काही कारणे आहेत.


टीबी हा जंतूमुळे होणारा रोग आहे. या जंतूचे नाव मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस आहे. हा संसर्गजन्य रोग आहे. खोकल्यातून,थुंकीतून, बेडक्यातून जंतू भोवताली व हवेत पसरतात व दुस-या माणसाच्या शरीरात श्वासाद्वारे प्रवेश करतात. रोग दुस-यांना होतो. एक रुग्ण दहा लोकांना आजार देतो.


लक्षणे :
खोकला - तीन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल तर थुंकीची, बेडक्याची तपासणी करावी.
ताप - साधा ताप असेल म्हणजे ताप खूप वर जात नाही, पण लो ग्रेड ताप असतो. विशेषत: रात्री येतो.
आहार - आहार कमी होतो. अन्नाची चव लागत नाही, निरुत्साह, चिडचिडसहीत वजन कमी होते.
उपचार :
लहानपणीच बीसीजी लसीकरण करावे.
संसर्गजन्य असल्यामुळे इतर माणसात मिसळताना काळजी घ्यावी, वेगळी खोली घ्यावी.
डॉक्टरकडे जाऊन तपासण्या व उपचार घ्यावेत.


ङ्मि३२ उपचार डॉक्टर करतात, याची यशस्विता 95 टक्के आहे.
मोकळी, शुद्ध हवा, समतोल आहार घ्यावा.


हा रोग राष्‍ट्रीय कार्यक्रमात येतो. त्या कार्यालयात संपूर्ण माहिती मिळते. मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावे. भारतात तीन लाख रुग्ण यामुळे मरण पावतात. म्हणून जागरूकता पाहिजे.


कोणत्या आजारात टीबी आजार वाढतो, जर एचआयव्ही बाधा असेल व एआयडीएस रोग झाला असेल तर त्या व्यक्तीस टीबीची बाधा पटकन होते. कारण, एचआयव्ही लागण प्रतिबंधक शक्ती कमी करते.


टीबीचा उपचार कमीत कमी सहा महिने घ्यावा लागतो व आरोग्याचे नियम पाळावे लागतात.
टीबी रोगाला वयाचे बंधन नाही. तो बालवयापासून वृद्धापर्यंत होतो. गरोदर स्त्रियांना विशेष काळजी घ्यावी लागते.
टीबी रोगासाठी राष्‍ट्रीय स्तरावर फार मोठे कार्य चलते.


टीबी हा रोग केवळ फुप्फसाचा नसतो तर तो हाडापासून डोळ्यापर्यंत सर्वच अवयवांना होऊ शकतो. मात्र, फुप्फसाच्या टीबीचे प्रमाण इतर अवयवांपेक्षा जास्त आहे.