आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्राशास्त्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी शरीर हे पाच महातत्त्वांपासून बनलेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश. आपली पाच बोटे त्यांचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा- तेज - अग्नी - सूर्य, तर्जनी - वायू - हवा, मध्यमा - आकाश - अवकाश, कनिष्ठिका - पृथ्वी, करंगळी - आप - पाणी. मुद्राशास्त्रानुसार मानवाच्या हाताच्या बारा मुद्रा आहेत व त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

महत्त्वाच्या बारा मुद्रा :
1. ज्ञान मुद्रा :
कृती - तर्जनीला अंगठ्याने स्पर्श केल्यास ही मुद्रा होते. इतर बोटे कशीही सहज स्थितीत राहू द्यावीत.
वेळ मर्यादा - कितीही वेळ ही मुद्रा करावी.
फायदे - मानसिक ताणामुळे होणारे दुष्परिणाम दूर करणे. उदा. वेडेपणा, राग, आळशीपणा डिप्रेशन इत्यादी. आध्यात्मिक आनंद चेह-यावर दिसू लागतो. मन एकाग्र होऊ शकते. बोटाच्या टोकाला उडणा-या नाडीवर लक्ष एकाग्र केल्यास भरकटणारे मन स्थिर-एकाग्र व्हायला मदत होते. तृतीय नेत्र किंवा सहावे संवेदना केंद्र विकसित होऊ शकते. परिणामी दिव्य दृष्टी प्राप्त होते.
9. जलोदरनाशक मुद्रा :
कृती - अनामिका / करंगळी वाकवून तिच्या दुस-या पेराच्या मागील अंगठ्याने स्पर्श करावा. वेळ मर्यादा - आजार पूर्ण बरा होईपर्यंत रोज करणे.
फायदे - अति पाण्याने झालेले दोष दूर करते.
10. प्राण मुद्रा -
कृती - करंगळी (वा अनामिका) व कनिष्ठिका वाकवून त्यांना समोरून अंगठ्याने स्पर्श करावा. वेळ मर्यादा - कितीही वेळ ही प्राणमुद्रा करावी. किमान 5-10 मिनिटे तरी करावी. फायदे - रक्तातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारे रोग बरे होतात. अशक्त स्नायू ताकदवान होतात. निद्रानाशाच्या रोगामध्ये ज्ञानमुद्रेसह व मधुमेहात अपान मुद्रेसह ही मुद्रा करावी.
11. अपान मुद्रा -
कृती - मध्यमा व कनिष्ठिकेच्या टोकांना अंगठ्याने स्पर्श करावा. वेळ मर्यादा - अशी काही मर्यादा नाही. जास्त वेळ करा व जास्त फायदे घ्या. फायदे - लघवी, घाम, मळ इत्यादी गोष्टी शरीराबाहेर सहज टाकून दिल्या जातात. पवित्र विचार मनात येऊ लागतात. बद्धकोष्ठ व मूळव्याध या रोगावर ही मुद्रा रोज सुमारे 45 मिनिटे तरी करावी. दाताचे आरोग्य सुधारते. मधुमेहावर नियंत्रण ठेवायला ही मुद्रा उपयोगी पडते. हळूहळू तोंड, नाक, डोळा व कान यांचेही रोग दूर करते.
12. अपानवायू मुद्रा -
कृती - तर्जनी वाकवून तिने अंगठ्याच्या मुळाशी स्पर्श करावा. अंगठ्याने तर्जनीच्या दुस-या पेरावरून मध्यमा व कनिष्ठिका यांच्या टोकाला स्पर्श करावा. वेळ मर्यादा - हार्ट अ‍ॅटकची लक्षणे दिसत असल्यास लगेच ही मुद्रा करावी. दिवसभरात अनेक वेळा करावी. फायदे - हार्ट पेशंटना अपान मुद्रा हे एक वरदान आहे. सॉबिट्रेट गोळी अथवा इंजेक्शनप्रमाणे काम होते. डॉक्टर येण्यापूर्वी पेशंट बरा होतो. ही मुद्रा रोज केल्याने हदयाची ताकद वाढते. डोकेदुखीदेखील लगेच कमी होते. पण ती तात्पुरती कमी होते. नंतर पुरेशी विश्रांती घ्यावी लागते. जठराच्या व आतड्याच्या हालचाली या मुद्रेने नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे पोटच्या जुनाट तक्रारी दूर होतात.