आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील टेलिकॉम सुविधांच्या विस्तारामुळे दरवर्षी १ लाख नोकऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेलिकॉम स्किल डेव्हलपमेंट ग्रुपद्वारे नीती आयोगाला सोपवलेल्या अहवालानुसार पुढील पाच वर्षांत देशातील टेलिकॉम क्षेत्रात ७ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील. या नोकऱ्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही प्रकारच्या व्यावसायिकांसाठी असतील. २०१५ मध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीचा महसूल केवळ ६.५ टक्के वाढला आहे. पाच वर्षांत पहिल्यांदा हे झाले. याच्या वाढीचा वेग १० टक्के कमीच राहिला. सेल्युलर ऑपरेटर्स असो.आॅफ इंडियानुसार गेल्या वर्षी ७ कोटी ९० लाख नवे वर्गणीदार-ग्राहक टेलिकॉम नेटवर्कशी जोडले गेले.

रिटेल सेगमेंटमध्ये अधिक संधी
अहवालानुसार रिटेल आणि हँडसेट सेगमेंट (प्रकार-विभागात) ३५ टक्के, सर्व्हिस प्रोव्हायडर २९ टक्के, नेटवर्क आणि आयटी व्हेंडर १८ टक्के, टेलिकॉम उत्पादन क्षेत्र १५ टक्के आणि पायाभूत सुविधा क्षेत्र ३ टक्के वर्कफोर्स कार्यशक्तीसाठी रोजगाराचा नवा मार्ग असेल. स्किल्ड टेक्निकल, नॉन टेक्निकल, इंजिनिअर, नेटवर्किंग अँड टेस्टिंग, क्वालिटी अॅनालिसिस, उत्पादन मॅनेजर, सुरक्षा प्रशासक, ग्राहक सपोर्ट स्टाफशिवाय मोबाइल टेलिफोनी, इंटरनेट प्रोटोकॉल मीडिया सिस्टिम, वायरलेस कम्युनिकेशनसारख्या फंक्शनल स्ट्रीम्समध्येदेखील नोकऱ्या मिळतील.

इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट संधी
इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या विविध प्रवाहांशिवाय पदविका आणि कौशल्य नसलेल्या लोकांसाठीदेखील रोजगाराच्या संधी विविध स्तरांवर उपलब्ध आहेत. उत्तम करिअरची इच्छा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग अथवा व्यवस्थापनाची पदवीच प्रवेशासाठीचा उत्तम मार्ग आहे. इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्समध्ये जेईईद्वारे प्रवेश मिळेल. मॅनेजमेंटच्या परंपरागत प्रवाहाशिवाय टेलिकॉमसारख्या फंक्शनल स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशनदेखील नोकरीच्या संधी देऊ शकतील. पदविका करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीदेखील अधिक संधी पायाभूत सुविधा आणि नेटवर्किंग तथा मेंटेनन्स विभागात आहेत.

टेलिडेन्सिट, इंटरनेटवापरात गावे मागे
देशातील गावांमध्ये टेलिडेन्सिटी शहरी क्षेत्राच्या तुलनेत एक तृतीयांशहूनही कमी आहे. मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर करणारे २९ टक्के ग्राहक ग्रामीण भागातील आहेत. या भागात टेलिकॉम सुविधांचा विस्तार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण होईल.

टेलिकॉम इंडस्ट्री भारतातील
३७ अब्ज डॉलर

होईल देशाचे मोबाइल सेवा बाजारपेठ २०१७ च्या शेवटीपर्यंत यात दरवर्षी सरासरी ५.२ टक्के त्यात वाढ होत आहे.
- जगातील दुसरा सर्वात मोठा टेलिकॉम बाजार आहे भारत.
- जीएसएमएच्या अनुसार वर्ष २०२० पर्यंत प्रत्येक चारमधून तीन फोनधारकांकडे स्मार्टफोन असेल आणि भारत जगातील चौथा सर्वात मोठा स्मार्टफोन बाजारपेठ होईल.
पॅकेज आणि उत्पन्न
अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रारंभिक पॅकेज ३ ते ५ लाख रुपये वार्षिकपर्यंत असते. इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी करिअर वाढीच्या संधी सर्वाधिक आहेत. मॅनेजमेंट प्रोफेशनल्ससाठी प्रारंभी वार्षिक पॅकेज ३ ते ४ लाख रुपयांपर्यंत असते. पदविकाधारक विद्यार्थ्यांना दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचे प्रारंभिक पॅकेज मिळू शकते. तथापि, या उद्योगात करिअरच्या वाढीच्या शक्यतेसह स्पर्धादेखील वाढली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रत्येक पदासाठी कमीत कमी ३० हून अधिक अर्जदार असतातच.

जॉब ट्रेंड्स
आयटी, सिव्हिल, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची मागणी : पायाभूत आणि टेलिकॉम सर्व्हिसेस क्षेत्राच्या विस्तारासह उद्योगात इलेक्ट्रॉनिक्स आणी आयटी इंजिनिअर्सशिवाय सिव्हिल आणि स्ट्रक्चरल स्ट्रीमची मागणी कायम राहील.

इंटरनेट आणि ब्रॉडबँड सर्व्हिसेस : उद्योगातील महसुलात अधिक भाग डेटा ट्रान्सफरमधून येतो. वॉयस ट्रान्सफरमुळे होणारे उत्पन्न कमी होत आहे. इंटरनेट आणि ब्रॉडबँड सर्व्हिसेससाठी ट्रेंड प्रोफेशनल्सची मागणी आणखी पुढे वाढणार आहे.
बातम्या आणखी आहेत...