आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणांचे महत्त्व सांगणारे ‘आठवणीतले दिवे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे संस्कृत आणि मराठी विषयाच्या अध्ययनासाठी नामवंत लेखकांची बरीच पुस्तके त्यांच्या वाचनात आली. त्यामुळे आपणही काहीतरी लिहिले पाहिजे या ऊर्मीतून लिहिता-लिहिता दहा पुस्तकांचे लेखन प्रभा बैकर यांनी केले. शिक्षणाबरोबरच शहरातील साहित्य व सामाजिक क्षेत्रातही त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. समाजाला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख व विविध सणांची माहिती व्हावी, या हेतूने त्यांनी ‘आठवणीतले दिवे’ या पुस्तकलेखनाचा विचार केला. चैत्र ते फाल्गुन या मराठी महिन्यांत येणा-या विविध सणांची कथा व महत्त्व सांगणारे हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकात गुढीपाडव्यापासून प्रत्येक महिन्यात येणा-या सणाची माहिती थोडक्यात देऊन त्यांचे पुराणातील महत्त्व, कथा आणि तो कसा साजरा करावा हे सांगितले आहे. या पुस्तकाचे लिखाण पूर्ण झाले आहे. सुपर्ण प्रकाशन-पुणे यांच्यातर्फे हे पुसतक लवकरच येत आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होत असून, त्यापूर्वीच ते बाजारात येणार आहे. यापूर्वीही बैकर यांची विविध विषयांवरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ललित, लघुकथा, बालगीते, कथा, बालकथा आदी विषयांवरील ही पुस्तके आहेत. शहरात गेल्या काही वर्षांपासून नवसाहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘शब्दसाधना’ परिवाराची स्थापना केली आहे. या परिवाराच्या त्या स्वत:ही सदस्या आहेत. परिवाराकडून दर आठवड्याला साहित्यविषयक विविध कार्यक्रम राबवण्यात येतो. त्यातून लेखकांना साहित्याची प्रेरणा मिळत असते. बैकर यांचे ‘आठवणीतले दिवे’ हे पुस्तक नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारे आहे. त्यातून विविध सणांचे महत्त्व नव्या पिढीला निश्चितच समजणार आहे.


राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार...
‘दवबिंदू झगमगणारे’ (ललित) या पुस्तकाला नाशिक येथील संस्थेकडून मालूजकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच 2003-04मध्ये बैकर यांना राज्यस्तरीय ‘अश्व काव्यलेखन’ पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती पुरस्कारही त्यांना मिळाला असून, अंकुर मराठी साहित्य संमेलन, मराठी साहित्य परिषद आदींमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.


बैकर यांचे आतापर्यंत प्रकाशित झालेले साहित्य...
मनोगत (ललित), प्राजक्त पाकळ्या (लघुकथा), आनंदमेळा (बालगीते), तिची गोष्ट (कथा), सत्कृत्याचे फळ (बालकथा), पणतीचा उजेड (मुलींचा जन्म), बाई मी (विसर), भोळी (विनोदी कथा), दवबिंदू झगमणारे (ललित), भरोनि सद्भावांची अंजुली (व्यक्तिचित्रे).


पुस्तकाचे नाव : आठवणीतले दिवे
प्रकाशक : सुपर्ण प्रकाशन, पुणे