आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतनाही होता है

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शिप ऑफ थिसिअस’ नावाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमामधले एका आजींच्या तोंडचं हे वाक्य. एका गरीब माणसावर झालेल्या अन्यायाविरुद्ध जिद्दीने उभ्या राहिलेल्या माणसाचा भ्रमनिरास होतो, तेव्हा आजी त्याला हे समजावते आहे, ‘मुला, तू काही तरी बदलावं या इच्छेने पछाडून काही तरी ‘केलंस’ नं, ते खूप आहे आणि बदलाचं म्हणशील तर तो ‘इतकाच’ होतो बघ.’


भारनियमन थोडीच बंद होणारे? किंवा पाण्याचा नेहमीचा मे महिन्यातला तुटवडा, शेतक-यांच्या आत्महत्या, युरोपचा आर्थिक घोळ, गेला बाजार शेजारच्या घरात काका काकूंवर हात उगारतात, यातले काय बदलते? गांधींनी, टिळकांनी, गाडगेमहाराजांनी, शिवाजी महाराजांनी इतक्या मोठमोठ्या उलाढाली, चळवळी केल्या, त्यानेसुद्धा कायमचं नाही काही बदललं, तर माझ्यामुळे काय बदल घडणार? मग कायको झिग झिग? काय फरक पडतो? काय आणि कितीने फरक पडतो शेवटी? आपण फार काही करू शकणार नाहीयोत हे खरे आहेच. पण म्हणून त्या इंच इंच बदलासाठी प्रयत्न थांबवायचे नसतात.
झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिये, मी इतिहास घडवेन, मी जगावर राज्य करेन अशा विचार आणि वृत्तींनी माणसांनी गोष्टी हातात घ्यायचे, आपले विचार लादायचे कष्ट घेतल्याचे पुरावे सगळ्या इतिहासातून दिसतात. हे सगळे करताना वेगवेगळे विचार आणि मतप्रवाह लोकांनी आपले मानले. आम्ही वेगळे, आम्ही दुर्दैवी, आम्ही बदल घडवणारे, आम्ही बदल नाकारणारे, आम्ही सनातन, आम्ही बंडखोर अशा वेगवगेळ्या विचारांची बांधिलकी पत्करत, बदलत, नाकारत जगणा-या प्रत्येक पिढीला सापडले ते एकच ‘सगळं अपुरं आहे, सगळं अपूर्ण आहे, शेवट नसलेलं.’
हे सगळ्या अट्टाहास आणि उलाढालीअंती मिळालेलंaconclusionधर्मांमधून सुरेखरीत्या झिरपत आलं. धर्म म्हणजे जगण्याची शैली या अर्थाने.
बैलगाडी ते विमान प्रवास बदलत गेले, वेगवान होत गेले तरीही ‘आपण कोणीही नसतो’ हे conclusion च सगळ्यांना सगळ्या उत्खननांमधून सापडत राहिले.
‘इतना ही हो सकता है’, हे मान्य करून आपला खारीचा वाटा स्वीकारून अणुच्या आकाराच्या बदलाबद्दल excited Iअसणे आणि ‘या सम हा’पेक्षा ‘झालेत बहु आणि होतील बहु’मधले सौंदर्य appreciate करायला शिकणे ह्याच्यात मजा आहे.
आपल्या स्वत:बद्दलच्या कल्पना, गैरसमज आणि अपेक्षांचे वजन हळूहळू फुग्यातल्या हवेसारखं सोडत हलकं होत होत nobody होणं जमायला हवं हे अस्वस्थपणाचे प्रवास करून आलेल्या सगळ्या काळच्या माणसाला realize होत राहिलंय.
nobody होऊन आपले role प्रामाणिकपणे निभावायला हवेत. ‘इतने पैसे में इतनाच मिलेंगा’ असे हिशेब न मांडत.
आपल्या वाट्याला येणारी माणसे, भावना, घटनांना लेबल न लावता त्यांना अनुभवत राहणे, हेच तर करायचे होते फक्त. हातिच्या! हेच असेल कदाचित realize
तुकारामांना अशाच अनुभवांच्या प्रवासातून ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान? सापडले असेल?
जगभरच्या सगळ्याच ‘तुक्या’ना हेच सापडत राहते पण, हे किती सुंदर आहे?
कोणी जी. के. चेस्टरटन म्हणाला here are two ways to get enough. One is to continue to accumulate more and more. The other is to desire less.
कोणी एल. फ्रँक बॉम म्हणाला का क here are two ways to get enough. One is to continue to accumulate more and more. The other is to desire less.

आणि मग हे लक्षात घेऊन घडणा-या गोष्टींना भिडण्यातला, अस्वस्थ असण्यातला चार्म वाढत राहतो, त्या त्या माणसाला बिझी ठेवतो, जिवंत आणि ताजं ठेवतो. जावेद अख्तरनी एका कवितेत म्हणलेय,‘जो अपनी बेताबियाँ साथ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम.’
पुलंचे एकपात्री प्रयोग सगळीकडे जोरदार सुरू असताना सुनीताबार्इंनी त्यांना एकदा विचारलेला प्रश्न होता तो म्हणजे ‘रमलास ते?’
त्यापुढच्या काही दिवसांत पुलंनी ते सगळे कार्यक्रम बंद केले, नवे लिहिले,नवी नाटकं लिहिली.
‘बदललं काय?’
मी जेव्हा कंटाळते, तेव्हा वाचते काही बाही पुलंचं. तेव्हा दर वेळी हसते. त्यांच्या साहित्याने ना प्रदूषणाचे प्रश्न संपतात न रस्त्यावरचे खड्डे बुजतात.
त्याने फक्त लोक हसतात काही सेकंद.
‘इतना ही हो सकता है.’
आणि या ‘इतना ही हो सकता है’ची व्याप्ती कळली की आत्ताच्या ‘लुटेरा’मधलं गाणं आठवतं.
‘जिंदा हूँ यार काफी है।’ खरंच काफी है, नै?