आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायरॉइड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गळ्याच्या पुढील भागात स्वरयंत्राच्या अगदी खाली श्वासनलिकेवर फुलपाखरासारखा आकार असलेल्या ग्रंथीला थायरॉइड असे म्हणतात. या छोट्याशा ग्रंथीचं वजन केवळ 15 ते 25 ग्रॅम एवढं असतं. आपल्या शरीरातील चयापचय नियंत्रित करणे आणि सर्व अवयवाचं कार्य सुरळीत चालवणे हे अंत:स्रावी ग्रंथीचं महत्त्वाचं कार्य. या ग्रंथीत ट्राय आयोडोथायरोनिन (३3) आणि थायरॉक्झीन (३4) या दोन हार्मोन्सची निर्मिती होते. आपला मेइंत असणा-या हायपोथॅलेमस आणि पिट्युटरीग्रंथी याच्या नियंत्रणाखाली थायरॉइड ग्रंथीचे काम चालते. मेइंतल्या पिट्युटरीग्रंथीत निर्माण होणा-या थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स (३.२.ँ.) चं महत्त्वाचं कार्य म्हणजे थायरॉइड ग्रंथीत तयार होणा-या हॉर्मोन्सची रक्तातील पातळी आवश्यकतेनुसार नियमित करणे, हे आहे. जेव्हा थायरॉइड ग्रंथीत ३3 आणि ३4 निर्मितीचं कार्य मंदावते तेव्हा तिला उत्तेजित करण्याचं काम टी. एस. एच. करते. जर थायरॉइड ३3 आणि ३4 या हॉर्मोन्सची निर्मिती आवश्यकतेपेक्षा जस्त करीत असेल तर ते कमी करण्याचं कामही हे ३२ेकरते.

थायरॉक्सिनच्या निर्मितीसाठी आयोडिनची आवश्यकता असते. कधी कधी थायरॉइड ग्रंथीचे कार्य बिघडते. थायरॉइडमधल्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं त्याला हायपर थायरॉइडिझम असे म्हणतात. तर कधी या हार्मोन्सची निर्मिती कमी प्रमाणात होते याला हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात. मुलांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी आयोडिन हा महत्त्वाचा व आवश्यक असा सूक्ष्म अन्नघटक आहे. याचा उपयोग थायरॉक्झीन तयार करण्यासाठी होतो. जे मुलांची शारीरिक व मानसिक वाढ होण्यासाठी आवश्यक असते. आपल्या देशात वायव्य, ईशान्य व हिमालयीन पट्ट्यात किंवा सातपुडासारख्या थंड हवेच्या ठिकाणी राहणा-या लोकांत आयोडिनयुक्त मिठाचा अभाव असतो. त्यामुळे अशा लोकांत गलगंड (थायरॉइड ग्रंथीला येणारी सूज) होतो.

त्यामुळे हायपोथायरॉइडिझम होतो. म्हणूनच खाण्यामध्ये आयोडिनची कमतरता असल्यास गलगंडाबरोबरच अन्य मानसिक व शारीरिक अपंगत्वाचे विकार होऊ शकतात. यापैकी बहुतेक सर्व विकारांचा प्रतिबंध खाण्यामध्ये नियमितपण आयोडिनयुक्त मिठाचा अंतर्भाव केल्याने होतो. खाण्यामध्ये रोज अत्यल्प आयोडिनचा समावेश असला तरी या विकारापासून पूर्ण सुरक्षितता प्राप्त होते.

गर्भावस्थेत असताना पहिल्या तीन महिन्यांत बाळाची वाढ आईच्या हार्मोन्सवर अवलंबून असते. नंतर हळूहळू थायरॉइडग्रंथी थायरॉइड हार्मोन बनवते, पण त्याला आयोडिनचा पुरवठा आईकडूनच होते. गर्भवती मातेला जर हायपोथायरॉइडिझम असेल तर वारंवार गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा जन्मणा-या बाळाला क्रेटिनिझम नावाचा आजार होतो. या आजारात थायरॉइड ग्रंथी थायरॉक्सिन हा स्राव निर्माण करू शकत नाहीत. बोलणे-लिहिणे, ऐकणे आणि इतर अनेक रोजच्या कार्यासाठी या हार्मोन्सची आवश्यकता असते त्याची कमतरता असेल तर मूल मतिमंद होते. त्याचा बुद्धांक कमी असतो. यातली काही मुले बहिरी, मुकी असतात. तिरळी होऊ शकतात. चेहरा सुजलेला असतो. त्याच्या अंगावर मेदं असतो. त्यांना थंडी सहन होत नाही. ती सतत सुस्तावल्यासारखी असतात.‘केटिनिझम’ होण्यासाठी केवळ आयोडिनचा अभाव हे एकच कारण नसून ते इतर अनेक कारणापैकी एक कारण आहे.

हायपोथायरॉडिझमचा इलाज म्हणजे थायरॉइड हार्मोन्स घेणे. ‘कन्जनायटल हायपोथायरॉडिझम’ किंवा ‘क्रेटिनिझम’ या दोषात बाळामध्ये जन्मत:थायरॉइड ग्रंथीचे कमी प्रमाणात असते किंवा पूर्णत: नसते. वेळेवर निदान, उपचार व सल्ला यामुळे अशा मुलांचे पुनर्वसन करणे शक्य होते. थायरॉइडच्या रक्त तपासण्या, स्कॅन यांनी या आजाराचे निदान होते. बाळ जन्मत: जरी नॉर्मल दिसले तरी औषधोपचाराला उशीर झाला तर प्रत्येक आठवड्याला ८ बुद्ध्यांकाची कमतरता पडते. जन्मत: निदान करून ज्या बाळाला उपचार केले जातात त्यांचा बुद्ध्यांक 1 महिन्यांनंतर निदान करून तेच उपचार केलेल्या बाळापेक्षा 20 अंकांनी अधिक असतो. त्यामुळे प्रत्येक नवजात बाळाची थायरॉइडची तपासणी करणे आवश्यक असते.

आयोडिनयुक्त मिठाचा आहारामध्ये नियमित वापर केल्यास आयोडिनच्या अभावामुळे गळ्यातील थायरॉइडची वाढ, मानसिक मागासलेपण, शारीरिक मागासलेपण, बहिरेपणा, (डेफ म्युटिझम), नवजात मुलांचे शारीरिकदृष्ट्या विकलांग आणि मानसिक मागासलेपण यांचा त्या योगे सहज प्रतिबंध केला जाऊ शकतो.