आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायरॉइड : एक सायलेंट किलर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या फास्ट फूड, फास्ट करिअर आणि त्याबरोबर येणारी जीवनशैली फास्ट झाली आहे. अचानक जाणवते की, वजन खूप वाढत चाललंय किंवा अचानक कमी झालंय. स्कीन ड्राय, केस खुरटे अन् डोळ्यांचा तारवटलेपणा...
झोप झाली नाही, प्रदूषणामुळे त्वचा व केस खराब झालेत अन् वजन तर काय... जेवायचा वेळही नक्की नाही. जे काही समोर सहज मिळेल ते अनेकांची खाण्याची तयारी असते. हळूहळू चिडचिड, विसराळूपणा, सतत संभ्रम ही लक्षणं जाणवायला लागतात. डॉक्टरांकडे गेल्यावर ते रक्त तपासणी करायला सांगतात. नंतर आपला रिपोर्ट येतो हायपर किंवा हायपो थायरॉइडीझमचा... आपल्या गळ्यात असणार्‍या स्वरयंत्राच्या मागे एक फुलपाखरासारखी ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. शरीराची वाढ, मेंदूचे कार्य, प्रजनन संस्थेचे संतुलन आणि एकूणच चयापचयाच्या क्रियेचे नियमन ही अत्यंत महत्त्वाची कामे या थायरॉइड ग्रंथीच्या संप्रेरकाच्या कार्यावर चालतात. अन्नघटकातून मिळणार्‍या सूक्ष्म क्षारांमध्ये आयोडीनच्या कमी-जास्त प्रमाणात या स्रावाची निर्मिती आणि कार्य अवलंबून असते.

आयोडीनची कमतरता
आयोडीनच्या अति प्रमाणामुळे थायरॉक्सिन ट्रलथायरो आयोडीन या संप्रेरकाचे निर्माण आणि संतुलन बिघडते अन् हायपोथायरॉइडची स्थिती उद्भवते. याउलट आयोडीनची कमतरता हायपरथायरॉइड या स्थितीला कारणीभूत ठरते. सुरुवातीला सामान्य वाटणारी लक्षणे जेव्हा वजनावर, मज्जासंस्थेच्या किंवा वाढीच्या कार्यावर परिणाम दाखवतात तेव्हा हे हायपो किंवा हायपरथायरॉइड आहे, हे लक्षात येते.

प्रतिकारशक्ती खालावते
हायपरथायरॉइडमध्ये वजन कमी होणे, थकवा, चिडचिड आणि नैराश्य जाणवते. चयापचयन क्रियेत बिघाड झाल्याने बद्धकोष्ठ, पाळीची अनियमितता, कॅल्शियमची कमतरता तसेच प्रतिकारशक्तीची कमी ही लक्षणे आढळतात. वेळीच तपासणी झाल्यास आयोडीनचे संतुलन करण्यासाठी त्याप्रमाणे भरपूर भाज्या, फळे असा तंतुमय आहार, मस्क्युलर स्ट्रेंथसाठी प्रथिनांची पूर्तता, कॅल्शियम अन् डी व्हिटॅमिनयुक्त पूरक आहार आणि चयापचय क्रियेसाठी कुठलाही संथ व्यायाम ही औषधोपचाराबरोबरच आहार नियोजनाची तत्त्वे महत्त्वाची ठरतात.

नैराश्याला आमंत्रण
हायपोथायरॉइडमध्ये अचानक वजनात लक्षणीय वाढ, नैराश्य, डोळ्यातील रेटिनावर प्रेशर वाढून बाहुलीचा आकार बदल, त्वचा, केसांचा कोरडेपणा आणि पाळीची अनियमितता, डोक्यात गोंधळ ही लक्षणे ठळकपणे दिसतात.

उपचार
> भरपूर तंतू आणि क्षार
असलेली भाज्या, फळे, वनस्पती, प्रथिनांचा प्रमाणित आहार, तेलबिया आणि तृणधान्य असा हलका आहार आवश्यक असतो.
> हाडांच्या आणि ज्ञानेंद्रियांच्या पोषणासाठी क्षारयुक्त आहार मेंटल रिलॅक्सेशनसाठी योगा-प्राणायाम आयोडिनयुक्त अन्नघटकांचा नियमित वापर, या मधून थायरॉइड कंट्रोलमध्ये राहू शकतो.

परिणाम
>एकूणच थायरॉइड, हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथी संलग्नपणे काम करत असल्याने वेळीच काळजी न घेतल्यास पुढे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार किंवा मज्जासंस्थेच्या विकारांकडे या आजाराची प्रगती होते.
>म्हणूनच या सायलेंट किलरकडे वेळीच लक्ष दिल्यास थायरॉइडची स्थिती पूर्ववत होऊ शकते आणि पुढील सर्व धोके टाळता येतात.
(deepalodha11771@gmail.com)