आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जे मिळवायचेय केवळ त्याबाबतच विचार करा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशस्वी माणसे नेहमीच दुस-याला मदत करण्याच्या संधीच्या शोधात असतात, तर अपयशी माणसे ‘आता माझे कसे होणार?’ असा कायम विचार करत असतात. थोड्याशा यशाने हुरळून न जाता दीर्घकाळ यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करायची असतील तर तुम्ही स्वत:ला शिस्त लावण्याची क्षमता विकसित करणे ही यशाची पूर्वअट आहे. सर्वच यशस्वी स्त्री-पुरुष नेहमीच मोठी स्वप्ने पाहतात. आपला भविष्यकाळ कसा असेल, याची कल्पना करतात, प्रत्येक बाबतीत तत्पर असतात आणि ध्येय, उद्देश किंवा हेतू साध्य करण्यासाठी दूरदृष्टीने दररोज परिश्रम घेतात. तुम्ही जर यशस्वी माणसांचा द्वेष करत असाल तर तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा घर करून बसेल. तुम्हाला यशस्वी व्यक्ती होण्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे, त्यापासून ती तुम्हाला दूर घेऊन जाईल. उलट जर यशस्वी माणसांच्या बाबतीत तुमच्या मनात आदर असेल तर यशाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल आणि तीच तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्याबाबतच विचार अथवा चर्चा करण्याची आणि ज्या गोष्टी अजिबातच नको आहेत, त्याबाबत विचार किंवा चर्चा करण्यास स्पष्टपणे नकार देण्याची स्वयंशिस्त ज्या दिवशी तुम्ही स्वत:ला लावून घ्याल, त्याच दिवसापासून तुमच्या जीवनाची यशप्राप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली असेल! त्याचा आजच प्रारंभ करा!