आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घकाळासाठी वजन पाठीवर घेणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीर्घकाळासाठी वजन पाठीवर घेणे
पाठीसाठी घातक
दप्तर पाठीवर घेतले की हात मोकळे राहतात; मग सायकल चालवायला, मित्र-मैत्रिणींशी गप्पा-खेळताना त्याची अडचण होत नाही. म्हणूनच शक्य तेवढी मुलं दप्तराचे ओझे पाठीवरच घ्यायला बघतात. सोय होते; परंतु त्यामुळे निर्माण होणारा पाठीवर आणि मानेवरचा ताण घातक ठरू शकतो. मणक्यांना आधार देणारे कोर स्नायू (core muscles) हे अत्यंत महत्त्वाचे आणि शरीरातले सर्वांत ताकदवान स्नायूंतील एक गट आहेत. त्यांच्यात जास्त भार पेलण्याची क्षमता नैसर्गिकच असते. म्हणूनच शरीरावर कुठलेही ओझे घ्यावयाचे असेल तर आपण नैसर्गिकरीत्या पाठीवरच घेतोय. परंतु तेच वजन दीर्घकाळासाठी घेणे पाठीसाठी हानीकारक ठरू शकते.
शाळेचे दफ्तर आणि मुलांची पाठदुखी
दरवर्षीलाखो लहान मुलं दररोज पाठीवर ओझे घेऊन शाळेत ये-जा करतात. काही चालत जातात तर काही सायकलने वजनदार दप्तराची कसरत करत जातात. परंतु, अतिवजन पाठीवर घेतल्यामुळे होणाऱ्या पाठदुखीकडे पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे. दप्तर पाठीवर घेऊन जाणे ही मुलांसाठी खूप साेयीची बाब असते.
पालकांची भूमिका
मुलांच्या पाठदुखीकडे पालकांचे लक्ष असणे गरजेचे
दप्तर एकाच खांद्यावर घेणे हानीकारक असते. त्यामुळे मणक्यांमध्ये असमतोल निर्माण होऊन मणके, बरगड्या, कंबर, खांदा, खुब्यांवर एकाच बाजूने जोर येतो.
दीर्घकाळ वजनामुळे नुकसान
शाळेचे दप्तर कसे वापरावे ?

वजनदार दप्तरांमुळे पाठदुखी कशी टाळावी
मानेचा आणि कंबरेच्या मणक्यांचा नैसर्गिक आकार जाऊ शकतो. त्यामुळे वारंवार स्नायूंवर तणाव, बरगड्यांना दुखापत आणि मणक्यांमधील सांध्यांवर जोर येऊ शकतो.
खांद्यांचा नैसर्गिक गोलाकार आणि रूप हरवू शकते.

नैसर्गिक गोलाकार गेल्यामुळे आणि खांदे ढेपाळल्यामुळे शरीर समोर वाकू लागते. परिणामी, तोल सांभाळणे कठीण जाते.
दप्तराचे मूळ वजनच हलके असावे. (चामड्यापेक्षा कापड, कॅन्व्हास किंवा पॉली-येराथेन मटेरियल वजनाला हलके असते.)

खांद्यांना अडकवण्याचे पट्टे किमान दोन इंच रुंदीचे असणे गरजेचे असते. तसेच त्या पट्ट्यांना पॅडिंग असणे हे चांगले.

दप्तराची पाठदेखील मुलायम आणि पॅडिंग असलेली असावी.
दप्तराला अनेक लहान कप्पे असणे चांगले. त्यामुळे दप्तरात वजन नीट समतोलपणे ठेवले जाते.
दप्तरांना कंबरेला बांधायचा पट्टा असल्यास उत्तम; नसल्यास असा पट्टा बसवून घेणे. हा पट्टा दप्तराला पाठीजवळ ठेवतो, पुढे वाकून चालायची गरज जाणवत नाही.
आजकाल काही दप्तरांना लहान चाके असतात, असे दप्तर वापरणे चांगले.
जास्त पुस्तक-सामान घेऊन जाण्याची वेळ आलीच, तर सर्व सामान पाठीवरच्या एकाच दप्तरात भरता एक वेगळी पिशवी किंवा बॅग नेणे अधिक चांगले असते.

नेहमी दप्तर दोन्ही खांद्यांवर घालावे.
जड पुस्तके आणि सामान नेहमी खाली आणि पाठीजवळ ठेवावे. हलके सामान-पुस्तके त्याच्यावर ठेवावे.
दप्तराच्या सर्व कप्प्यांमध्ये सामान योग्यरीतीने ठेवावे, असे केल्याने वजन आणि लोड याचा समतोल साधला जातो.

दप्तर भरल्यानंतर पाठीला कुठेही कुठलीच टोकदार वस्तू लागत किंवा टोचत नाही, याची काळजी घ्यावी.
दप्तर पाठीवर घातल्यानंतर याची दखल घेणे गरजेचे असते, की ते कंबरेपेक्षा खाली नको. तसेच वरचा भाग डोक्यापेक्षा वरदेखील नको.

दप्तर उचलताना कंबरेतून वाकता गुडघ्यातून वाकून उचलणे गरजेचे आहे.
दप्तर घेऊन चालताना समोर वाकून चालणे टाळावे. वाकून चालायची गरज आढळून आल्यास, दप्तरातून काही सामान काढून समोर हातात घ्यावे.

मुलांच्या वजनाच्या १०-१५ टक्क्यांपेक्षा जास्त वजन दप्तरात नसावे, हे अत्यंत गरजेेचे आहे.
मुलांना वजनदार दप्तरांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे.
दप्तर निवडताना योग्य प्रकारचे दप्तर निवडण्यास मदत करा.
त्यांच्या गरजेनुसार लहानातले लहान दप्तर निवडून द्या. मोठ्या दप्तरात नको तो मोठा पसारा मुलांसोबत शाळेत जातो.

शिक्षकांशी बोलून रोजचे सामान कमी करावे.
शक्य तेवढी पुस्तके शाळेतच ठेवा. शिक्षकांना सांगून मुलांसाठी लॉकरची सोय करून घ्या.
तुम्ही सतर्क व्हाल आणि लक्ष द्याल तरच अवजड दप्तरांमुळे मुलांच्या पाठीची होणारी हानी टळेल.
बातम्या आणखी आहेत...