आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहान मुलांतील ल्युकेमियावरही उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ल्युकेमिया या गटात मोडणा-या आजारात शरीराच्या बोन मॅरो या भागात मोठ्या प्रमाणावर असाधारण पांढ-या रक्तपेशींची निर्मिती होते. मुळात या बोन मॅरोचे महत्त्वाचे कार्य म्हणजे लाल रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स), प्लेटलेट्स आणि पांढ-या रक्तपेंशी (व्हाइट ब्लड सेल्स) या पेशींची निर्मिती करणं हे आहे. शरीराला होणा-या जंतुसंसर्गाचा (इन्फेक्शन) मुकाबला करण्यांच मोलाचं कार्य या पांढ-या रक्तपेशी करत असतात.

ल्युकेमियाग्रस्त रुग्णात एकीकडे पांढ-या भिन्न व असाधारण पेशींची वेगात वाढ होत असतांना दुसरीकडे त्याच बोन मॅरोची लाल रक्तपेशी व प्लेटलेट्सची निर्मिती मंदावते. अ‍ॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा लहान मुला त सर्वाधिक आढळणारा ल्युकेमियाचाच एक प्रकार. सुरुवातीला या रोगाची लक्षणे सौम्य असली तरी हा रोग झपाट्याने वाढत जातो. अखेरीस या रोगग्रस्त रुग्णाची अनेक संसर्गजन्य रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती क्षीण होते. ल्युकेमियाच निदान होणं ही त्या मुलाच्या कुटुंबाचं मनोधैर्य उद्ध्वस्त करणारी घटना असते. ल्युकेमियावरचे खर्चिक उपचार कुटुंबाला खचितच परवडणारे असतात. कॅन्सर स्पेशालिस्ट (ऑन्कोलॉजिस्ट्स) तपासण्या करतात, उपचार सुचवितात. उपचार करणा-यात मग त्यांच्या बरोबरच बालरोगतज्ञाचा, नर्सेसचा, सायकोलॉजिस्टचा समावेश असतो उपचारात किमोथेरपी, गरज भासल्यास रेडिओथेरपी उपचार पद्धतीचा समावेश असतो.
लक्षणे : - ल्युकेमियाच्या प्रकारानुसार रुग्णात लक्षणे आढळून येतात. सुरुवातीला सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णात त्या लक्षणाची तीव्रता वेगात वाढत जाते. अशा रुग्णात : 1, वजनात घट 2. अशक्तपणा 3. सौम्य ताप 4. हाड किंवा सांधे दुखणे 5. पांढरटपणा (हिमोग्लोबिनची कमतरता) 6. प्लेटलेटची निर्मिती घटल्याने थोडं खरचटलं तरी रक्तस्राव होणे 7. जंतुसंसर्ग - तोंड येण्यापासून ते तीव्र न्युमोनियासारखे आजार उद्भवणे. लक्षणे आढळून येतात. याशिवाय ल्युकेमियाच्या प्रकारानुसार अन्य काही लक्षणे आढळून येतात.
गुंतागुंती : - शरीरातल्या वेगवेगळ्या भागात रक्तस्राव आणि जीवघेणे जंतुसंसर्ग या ल्युकेमिया या आजाराच्या गुंतागुंती होत योग्य उपचार केले नाहीत तर इतर कॅन्सरप्रमाणे ल्युकेमिया जीवघेणे ठरतात. त्यात सुरुवातीला उपचारांना यश्‍ा आलं तरी पुन्हा ल्युकेमिया उद्भवण्याची शक्यता असतेच. शिवाय उपचाराचे अनेक साइड इफेक्टही असतात.
यांना ल्युकेमियाचा धोका अधिक : - रेडिएशनची बाधा झालेल्या किंवा वेगवेगळ्या ड्रग्जचा परिणाम म्हणून ल्युकेमिया होतो.जर एका जुळ्यातील मुलाला ल्युकेमिया झाला तर दुस-या जुळ्यालाही ल्युकेमिया होण्याची शक्यता अधिक असते. डाउन्स सिंड्रोम असलेल्या मुलांत ल्युकेमिया मोठ्या प्रमाणावर आढळतो. दोन ते सहा या वयोगटातील मुलात ल्युकेमिया होण्याचं प्रमाण अधिक असत तर मुलींपेक्षा मुलांत ते थोडसं जास्त असत.
निदान : - ब्लड स्पिअरसारख्या साध्या चाचण्याच्या मदतीने ल्युकेमियाचं निदान करता येत असलं तरी ल्युकेमियाचं निदान पक्कं करण्यासाठी त्याच्या बोन मॅरोची तपासणी करणं अनिवार्य असते. एका लघुशस्त्रक्रियेने बोन मॅरोची तपासणी करण्यात येते. ल्युकेमियाचा प्रकार निश्चित करण्यासाठी अन्य चाचण्याही कराव्या लागतात. ल्युकेमियावर उपचार करण्यासाठी त्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
वर नमूद केलेल्या प्रकारानुसार ल्युकेमियाचा उपचार निश्चित केला जातो. अचूक आणि चपखल उपचारावरच रुग्णाचे बरे होणे ठरलेले असते. सर्वच ल्युकेमियात किमोथेरपीचे उपचार करावे लागतात. उपचारांची विभागणी खालील तीन प्रकारांत केली जाते.
* रेमिशन इंडक्शन : या उपचाराच्या पहिल्या प्रकारात शरीरातल्या सर्व असाधारण पेशींचा नायनाट करण्यात येतो.
*सेंट्रल नर्व्हज सिस्टिम थेरपी : उपचाराच्या दुस-या पायरीत रुग्णाला अतिरिक्त किमोथेरपी देण्यात येते, त्यामुळे पुन्हा ल्युकेमिया होण्याची शक्यता नाहिशी होते. त्यामुळे ल्युकेमियाग्रस्त मुलांच्या मेंदूत व स्पायनल कॉर्ड (माकड हाड) ल्युकेमियाचा प्रसार रोखला जातो.
* मेंटेनन्स थेरपी : उपचाराच्या या अंतिम टप्प्यात रुग्णाला पुन्हा कॅन्सर उद्भवू नये म्हणून काही वर्षे उपचार चालूच ठेवले जातात.
कॅन्सरपेशींना मारणा-या औषधींचा समावेश किमोथेरपीत केला जातो. दुर्दैवाने किमोथेरपीसाठी वापरण्यात येणा-या औषधींचे अनेक साइड इफेक्टस आहेत. त्यात प्रतिकारशक्ती खच्ची होणे, मळमळ, उलट्या होणे, यकृतावर सूज येणे, त्वचेचा दाह होणे, केस गळणे यांचा समावेश असतो. ए एम एल किंवा सी एम एल या ल्युकेमियाच्या प्रकारासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन ही करावे लागते. आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब केल्यास ए एल एल आणि काही प्रकारचे ल्युकेमिया बरे होतात. मात्र ए एम एल किंवा सी एम एल ग्रस्त मुलांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करणं अगत्याच ठरतं. जरी अशा उपचारांनी ल्युकेमिया बरा झाला तरी पुन्हा ल्युकेमियाग्रस्त मुलांची पुढे नियमित तपासणी करावी लागते.
मुलाला ल्युकेमिया झाला हे कळणं त्या कुटुंबासाठी मोठा मानसिक आघात असतो. ल्युकेमियावर उपचार करणारी डॉक्टरांची टीम वैद्यकीय उपचारासह तुम्हाला मानसिक आधार देण्याचं मोलाचं कामही करते.
ल्युकेमियाचे प्रकार
* अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ए एल एल) : - ल्युकेमिया झालेल्या एकूण तीन-चतुर्थांश मुलांत ल्युकेमिया हा प्रकार आढळून येतो. या प्रकारातली मुले किमोथेरपीच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात. त्यातली जवळजवळ 80 टक्के मुले पाच वर्षाहून अधिक काळ जगतात.
* अक्युट मायलोजिनस ल्युकेमिया (ए एम एल) : - ल्युकेमियाग्रस्त रुग्णात आढळणारा हा दोन क्रमांकाचा आजार असून त्याचं प्रमाण एकूण ल्युकेमियाच्या 10 टक्के एवढं असतं. तेही उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात.
* क्रोनिक मायलोजिन्स ल्युकेमिया (सी एम एल) : - आणि ज्युव्हेनाइल मायलोजिनस ल्युकेमिया (जे सी एम एल) हे क्वचितप्रसंगी आढळणारे ल्युकेमियाचे अन्य प्रकार आहेत. सी एम एल चे प्रमाण 3 टक्के तर जेसीएमएस चे प्रमाण 5 टक्के ऐवढे असते.
* जवळजवळ 9 टक्के ल्युकेमियाग्रस्त मुलात वरच्या प्रकारचे वर्गीकरण नसलेल्या ल्युकेमियाचा प्रकार आढळतो.


dr.sanjayjanwale@rediffmail.com