आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबात नव्याने विचार रुजवीन..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमच्या कुटुंबात असं कोणी डिलिव्हरी रूममध्ये अजून तरी गेलेलं नाही. भारतात असं आत जाता येत नाही याची पुसटशी कल्पना मात्र होती. काही रुग्णालयांत आत जाण्याची सुविधा असते, असं माझ्या ऐकिवात आहे. मात्र आत जाण्याची सुविधा नसेल तर याला विरोध करायला हवा. आपला पार्टनर कठीण परिस्थितीत असताना आपण बाहेर राहण्याचा विचार बुद्धीला आणि मनाला मुळातच पटत नाही.
मी घरात तसा विषय घेतलाही होता. अर्थात मला आत जावंसंच वाटतंय. ज्या रुग्णालयात अशी सुविधा आहे अशाच रुग्णालयाला माझी पसंती असेल. माझ्या बहुतेक लग्न झालेले मित्र बाळाच्या तयारीत आहेत. एकाला सिझेरियनमुळे आत जाऊ दिलं नाही. दुसरा मात्र डिलिव्हरी रूममध्ये जायची इच्छा ठेवून आहे. आपल्याकडे एकाच डिलिव्हरी रूममध्ये एकाच वेळी दोन-तीन डिलिव्हरी होतात त्यामुळे प्रायव्हसीचा मुद्दाही आहेच.