Home | Magazine | Madhurima | types-of-expenditure

खर्चाचे विविध प्रकार

गौरी विश्वासराव, चार्टर्ड अकाउंटन्ट | Update - Jun 10, 2011, 12:58 PM IST

जेव्हा एखादी वस्तू कमी किमतीत मिळते तेव्हा तिचा साठा करून ठेवणे. अर्थात ही बाब नाशिवंत वस्तूंना लागू होत नाही. दुसरा उपाय जर एखादी गोष्ट महाग मिळत असेल तर त्या गोष्टीचा पर्याय शोधणे.

  • types-of-expenditure

    खर्च आणि त्यावरील नियंत्रण हे आपण मागील लेखात वाचले. आपण बघितलेच आहे की, खर्चावर नियंत्रण करण्यासाठी तो identify होणे महत्त्वाचे असते.
    खर्चाचे आणखीही काही प्रकार असतात. ते जसे कंपनीसाठी लागू होतात तसेच ते दैनंदिन व्यवहारामध्येही दिसून येतात. ते प्रकार म्हणजे Fixed Cost, Variable Cost, Semi-variable Cost. Fixed Cost म्हणजे असे खर्च जे दर महिना अथवा वर्षाला करावेच लागतात. उदा. आॅफिसच्या जागेचे भाडे. Variable Cost म्हणजे असे खर्च जे आपल्या गरजेवर अवलंबून आहेत. म्हणजे उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल. जसे उत्पादन करायचे असेल त्या कच्च्या मालाचा खर्च करावा लागतो. हा खर्च आपण आपल्याला हवा तेव्हा बदलू शकतो. म्हणून अशा खर्चांना Variable Cost म्हणतात. Semi-variable Cost म्हणजे जे काही प्रमाणात नियंत्रित असतात आणि काही प्रमाणात अनियंत्रित असतात.
    आता आपण आपल्या घरगुती खर्चाविषयी बोलूया. आपल्या घराचे भाडे, कर्जाचे हप्ते हे सगळे आपल्यासाठी Fixed Cost आहेत. हे असे खर्च आहेत जे आपल्याला महिन्याकाठी अथवा वर्षाकाठी Pay करावेच लागतात; पण हा खर्च आपल्या नियंत्रणात असतो. कारण त्याचा कालावधी आणि रक्कम ठरावीक असते. त्यामुळे त्या खर्चासाठी थोडे पैसे / रक्कम बाजूला ठेवून मुदतीअंती आपण तो खर्च पूर्ण करू शकतो.Variable Cost म्हणजे आपल्यासाठी उदाहरण म्हणून वाण्याचा खर्च घेऊया. जर आपण आपल्या या खर्चाचा नीट अभ्यास केला तर असे दिसून येते की, महिन्याकाठी हा खर्च होत असला तरी तो एकसारखा नसतो. उदा. सणाच्या दिवसांत, विशेषत: दिवाळीच्या सुमारास हा खर्च सर्वात जास्त असतो. अशा खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा एक उपाय म्हणजे जेव्हा एखादी वस्तू कमी किमतीत मिळते तेव्हा तिचा साठा करून ठेवणे. अर्थात ही बाब नाशिवंत वस्तूंना लागू होत नाही. दुसरा उपाय जर एखादी गोष्ट महाग मिळत असेल तर त्या गोष्टीचा पर्याय शोधणे. आता आपण Semi-variable Cost विषयी बोलू. आपल्या विजेचं बिल; एक ठरावीक रक्कम आपल्याला द्यावीच लागते. त्यानंतर वेगवेगळे स्तर असतात म्हणजे आपण जेवढी जास्त वीज वापरू तसे दर बदलत जातात. हा खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी ऊर्जा काळजीपूर्वक वापरणे, योग्य ठिकाणी योग्य खर्च करणे असे उपाय करावे लागतील. आता या तीन प्रकारच्या खर्चांवर तुम्ही कसे नियंत्रण ठेवणार आहात? किंवा तुम्हाला काही उपाय सुचत असतील तर आम्हाला नक्की कळवा.

Trending