आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता...हिशेब नाही ठेवला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणी कधी छळले किती,
हिशेब नाही ठेवला
मन माझे जळले किती,
हिशेब नाही ठेवला
या इथे अन् त्या तिथे, नेम त्यांनी साधला
बाण उरी घुसले किती,
हिशेब नाही ठेवला
जखमा जर ओल्या उरी,
हास्य नाही लोपले
तोंडामध्ये साखर अन् बर्फ शिरी ठेवला
विद्ध विद्ध झालो जरी, अंतरी रडलो जरी
आसवाचा थेंबही, नाही कुणा दावला
आता तर त्यांना मी, माफही केले पुरे
द्वेषाचा लेशही, नाही मनी ठेवला...