अल्ट्राबुक घेताना या / अल्ट्राबुक घेताना या गोष्टीची काळजी घ्या

Jul 06,2012 10:30:14 PM IST

जर तुम्ही लॅपटॉपऐवजी अल्ट्राबुक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही आवश्यक गोष्टी लक्षात घेणे जरुरी आहे. अल्ट्राबुक लॅपटॉपच्या तुलनेत वजनाने हलका असून त्याची कामाची गती जास्त आहे. तसेच टॅब्लेटच्या कार्यपद्धतीवर नाराज लोकांना हा एक समर्थ पर्याय समोर आलेला आहे.
लॅपटॉपच्या तुलनेत अल्ट्राबुकची जाडी 0.8 इंच आणि वजन 1.8 किलोग्रॅम आहे. याची स्क्रीन 13 ते 15 इंचाची असते. सध्या भारतीय बाजारपेठेत अल्ट्राबुकची किंमत जास्त आहे, पण येत्या काही दिवसात ती कमी होऊन 30 हजारांवर येईल.
चला तर मग अल्ट्राबुकची वैशिष्ट्ये जाणून घेऊया -
टचपॅड - अल्ट्राबुकच्या निर्मात्यांनी याला अधिक आकर्षक बनवण्यासाठी यात बटनलेस टचपॅडचा वापर केला आहे. व्यावसायिक कामात याचा वापर करणे अवघड जाते, कारण टाइपिंग करताना याचा त्रास जाणवतो. तेव्हा अल्ट्राबुक खरेदी करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जर तुम्ही बोटाने टचपॅडने स्क्रोल करून याचा अनुभव घेतला आणि त्याने अडचण न जाणवल्यास तो खरेदी करण्यास हरकत नाही.
स्पीड आणि स्टोअरेज
काही निर्माता कंपनी ग्राहकांना इनकार्पोरेटेड हायब्रिड सिस्टिम विकण्याचा प्रयत्न करतात. यात मेमरी तर जास्त असतेच पण कामाची गती कमी असते. विशेषत: तुम्ही एखादी फाइल कॉपी करत असाल तर यात सॉलिड स्टेट ड्राइव्ह आहे असे वाटत नाही, पण तुम्हाला गती अधिक पाहिजे की, स्टोअरेज हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला कामात गती हवी असेल तर तुम्हाला एसएसडीची गरज आहे, जी फक्त अल्ट्राबुकमध्ये उपलब्ध आहे.
पोटर््स घेण्यास विसरू नका
जर तुम्ही कॅमेºयातील फोटो किंवा व्हिडिओ अल्ट्राबुकमध्ये एसडी कार्डद्वारे ट्रान्सफर करत असाल तर ते सोपे जाईल. तसेच एसडी कार्डशिवाय अन्य डिव्हाइसचा वापर करत असाल, तर तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यात तुम्हाला व्यवसायानिमित्ताने वारंवार बाहेर फिरावे लागत असेल, तर तुमच्या कामाप्रमाणेच आवश्यक डिव्हाइस खरेदी कराल. त्यामुळे अल्ट्राबुक खरेदी करताना इंटरनेट पोर्ट आणि व्हिजीए पोर्ट घेण्याचे विसरू नका. हे गरजेचे आहे.
बॅटरी लाइफ : साधारणपणे अल्ट्राबुकची बॅटरी सिलबंद येते. त्याला नंतर आपण बदलू शकत नाही. म्हणून जास्त पॉवरची बॅटरी घेणे कधीही चांगले. साधारणत: दुकानदार बॅटरीच्या लाइफबद्दल अव्वाच्या सव्वा माहिती देतात. पण परिस्थिती वेगळीच असते. जास्तीत जास्त 6 ते 7 तासाची गॅरंटी मिळाल्यास ती चांगली आहे असे मानावे.
डिझाइन : पोर्टेबिलिटीच्या दृष्टीने अल्ट्राबुक उपयुक्त डिव्हाइस आहे. अल्ट्राबुकची बॅकलिट की-बोर्ड कमी प्रकाशातही टाइपिंग सहजपणे करू शकता. याच्या अल्युमिनियम आणि फायबर बॉडीचा लूक लोकांना फार आवडतो.
स्क्रीन साइझ व रेझोल्युशन
सुरुवातीला अल्ट्राबुक बाजारात सादर झाले तेव्हा याची स्क्रीन 13 इंच होती, आता अल्ट्राबुकची नवी रेंज येत आहे त्यात 14 ते 15 इंचाची स्क्रीन मिळते. स्क्रीनसाइज बरोबर रेझोल्युशनही लक्षात घ्यावे लागणार आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्याचे रेझोल्युशन अधिक चांगले आहे.

X