आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Unnecessary Hair On Face Dignostic And Longlasting Treatment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेह-यावरील अनावश्यक केस निदान व कायमस्‍वरूपी उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रत्येकाच्या मनाचा, अंतरंगाचा आरसा म्हणजे त्या व्यक्तीचा चेहरा असतो. असे म्हणतात. सतेज व नितळ चेहरा, प्रत्येकास हवाहवासा वाटतो. सुदैवाने काही व्यक्तींना तसा चेहरा मिळतोही; परंतु काहींच्या चेह-यावर असलेल्या अनावश्यक केसांमुळे त्यांचे सौंदर्य कमी झालेले असते. अशा समस्या स्त्री आणि पुरुषांमध्ये उद्भवल्याचेदिसते. 15 ते 50 वयोगटातील स्त्रियांमध्येही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. या लेखाच्या माध्यमातून विशेषत: स्त्रियांमधील या सौंदर्य समस्येचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

समान्यता प्रत्येक स्त्रीच्या चेह-यावर लव स्वरूपात केसांची उपस्थिती असते; परंतु 15 ते 20 टक्के स्त्रियांच्या ओठावर, हनुवटीवर, गालावर, गळ्यावर, मानेवर काही प्रमाणात कपाळावर केसांची वाढ जास्त प्रमाणात होते. यास hirsutism असे म्हणतात.
अनावश्यक केसांच्या वाढीची कारणे-
* संप्रेरकांचा अनियमितपणा (hormonal lmbalance)
तारुण्यामध्ये मासिक पाळी व इतर शारीरिक बदलांमुळे काही संप्रेरक तयार होतात. काही संप्रेरकांचे प्रमाण (testosterone) आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर केसांची वाढ जास्त प्रमाणात होते. तसेच काही स्त्रियांच्या स्त्रीबीजामध्ये (ovaries) एका पेक्षा जास्त गाठी (polycystic)जास्त असतील तर त्यांच्या चेह-यावर केसांची वाढ जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते.
* औषधांच्या दुष्परिणामांमुळे : ( drug induced)
चेह-यावर steroid creamsजास्त दिवस लावल्यामुळे तसेच पोटामधून steroid चे सेवन किंवा संतती प्राप्ती करिता काही औषधांच्या (hormonal therapy) उपचारामुळे चेहे-या वरील केसांची वाढ जास्त प्रमाणात होत असल्यामुळे दिसून येते.
* अंतस्थ : (endocrinal disordors)
शरीरामध्ये काही अंतस्थ:ग्रंथींच्या आजारामुळे शरीरातील संप्रेरकांचे (hormones)प्रमाण अनियमित होते व त्यामुळे काही स्त्रियांमध्ये चेह-यावर केसांची वाढ होते. thyroid, adrenals, ovaries इत्यादी आजारातील संदर्भात ही लक्षणे दिसून येतात.
उपचार करण्यासाठी काही तपासण्यांची आवश्यकता असते. त्यामध्ये रक्त तपासण्या व सोनाग्राफी इत्यादींचा समावेश होतो.
*उपचारापूर्वी करावयाच्या तपासण्या : अशा व्याधीवर उपचार करण्यासाठी रक्तातील संप्रेरकांचे प्रमाण तपासणे गरजेचे असते. sr, fsh, srlh, sr testosteron, sr prolactin इत्यादी तपासण्यांचा यात समावेश होतो. तसेच स्त्री-बीजांमध्ये जास्त कप्पे गाठी (policystic overies)असल्याची शक्यता असेल तर त्यासाठी सोनोग्राफी करणे त्या संदर्भात स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. तसेच इतर अंतस्थी:ग्रंथींच्या सोप्रानो डायोड लेसर उपचाराच्या मदतीने पुरुषांच्या दाढीच्या केसांच्या समस्याही सोडविणे शक्य आहे. जास्त प्रमाणात वाढ झालेले दाढीचे केस, गळ्याच्या खाली व गालावरील भागात वाढलेले अनावश्यक केस ( beard shaping) कायमस्वरूपी नाहीसे करता येणे या उपचार पद्धतीच्या माध्यमातून शक्य आहे. तसेच दोन भुवयांमधील केसांच्या वाढीपासून देखील कायमची मुक्तता मिळू शकते. चेह-यावरील अनावश्यक केसांपासून कायमची मुक्ती ही प्रत्येकास मिळू शकते.. फक्त गरज आहे ती योग्य लेसर व तज्ज्ञ डॉक्टरांची...!