आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Usha Mundhe Article About Shantivan, Beed, A Project Of Kaveri Nagargoje.

वेदनेशी नाते जोणणारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाळवंडी येथील रामा पठाडे या ऊसतोड कामगाराचा ट्रॅक्टरवरून पडून अपघाती मृत्यू झाल्याची बातमी तिने पेपरात वाचली. तिचं मन कासावीस व्हायला लागलं. पणजोबांपासून तीन पिढ्या भारतीय सैन्यात असल्यामुळे रक्तही सळसळायला लागलं. मग तिने सुरेश राजहंस या कार्यकर्त्याला सोबत घेऊन नाळवंडी गाठलं. पठाडेचं घर म्हणजे केवळ चार पत्र्यांचा आडोसा. अपंग आणि भोळी पत्नी, सीमा आणि ऊर्मिला या दोन मुली. घरात अठराविश्वे दारिद्र्य. ती गेली तो तिसरा दिवस होता. अस्थी गोळा करण्यासाठी गावकरी जमले होते. विधी पार पाडून रामाची पत्नी आणि दोन्ही मुली दुसर्‍याच्या शेतात कामावर निघाल्या होत्या. तिने त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या, रोजंदारीस नाही गेलो तर वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी पैसे कोठून आणणार? हा प्रश्न तिच्या मनाला बोचू लागला आणि तिने ठरवलं, की सीमा आणि ऊर्मिला यांना शिक्षणासाठी दत्तक घ्यायचं. ती आहे कावेरी नागरगोजे. तिने त्या दोघींना सोबत आणलं व पती दीपकशी चर्चा करून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी ‘शांतिवन’ प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं. ‘शांतिवन’ सुरू होऊन तेरा-चौदा वर्षं झाली आहेत. जवळपास साडेसातशे मुलांना हक्काचं शिक्षण व डोक्यावर छत्र उपलब्ध करून देण्याचा संकल्प कावेरीने उचलला आहे.

बहुतेकांच्या नजरेत बीड जिल्ह्याची ओळख म्हणजे केवळ ऊसतोड कामगारांचा जिल्हा. या कामगारांनी उभं आयुष्य आपल्या मुलाबाळांसोबत उसाच्या फडात घालवायचं हे ठरलेलंच. फडात मुलांना ना शिक्षण ना आरोग्य. त्यांचा कैवारीही कोणी नाही. अशा या मुलांना शिक्षण मिळावं व त्यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी कावेरी नागरगोजे प्रयत्न करीत आहे.

सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा..

(sumasantosh1515@gmail.com)
(संपर्क : कावेरी नागरगोजे, शांतिवन, आर्वी, बीड. 9421282359 / 9923772694)