आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Usha Parab Article About Ganapati Festival In Konkan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहेरचा मोरया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपती म्हणजे आमच्यासाठी केवढा मोठ्ठा सण! शाळेला चांगली आठ दविस सुट्टी असणार. नवे कपडे मिळणार. घरातली सगळी माणसं कामंधामं टाकून एकत्र असणार. रोज गोडधोड खायला मिळणार. फुगड्या, भजन, पाहुणे. केवढी ती गडबड, गोंधळ, उत्साह नि उल्हास. माझ्यासाठी अजून एक गंमत होती. लोकांच्या घरी मोठ्या भाऊंबरोबर भजनात ऐटीत गायला मिळणार.
गणपतीचे वेध लागलेले असायचे ते तीन-चार महिन्­यांपासूनच. आमच्या शेजारच्या गणपतीशाळेत गणपतीची माती भिजायला पडली की आम्हा पोरांच्या उत्साहाला उधाण सुरू. त्यातली इवलीशी माती मिळावी म्हणून काय काय हिकमती आणि िजवाचा आटापिटा चालणार. पण गणपतीकाका (गणपती करणारा) आम्ही त्यांची माती चोरू म्हणून आम्हाला हुसकावून लावणार. तरीही शाळेत जाता येताना गणपतीच्या शाळेत तास-तास उभं राहून काका गणपती कसे बनवतात ते आम्ही बघत बसणार.
पाटावर गणपतीचा आकार पूर्ण होत आला, की आमची घाई, ‘काका, उंदीर करू?’ खूप भाव खात काका ‘हो’ म्हणणार. मर्जीतल्या आम्हा दोन-चार पोरांना उंदीर बनवण्याची परवानगी देणार. काकांचं एक बरं असणार. उंदीर उंदरासारखाच दिसावा असा त्यांचा आग्रह नसणार. मधे एक मोठा गोळा (उंदराचे पोट) पुढे एक छोटा गोळा (उंदराचे तोंड) त्याला पुढे चोचीसारखं ­िनमुळतं. गोळ्याला दोन पाकळीसारखे कान आणि पाठीमागे मातीच्या सुरळीची लांबलचक शेपटी. गणपतीच्या पायाशी पाटावर चिकटवलं की झाला उंदीर.
सुट्टीच्या दविशी मी ऐटीत घरात सांगणार, ‘गणपतीकाकाने मला गणपती रंगवायला बोलावलंय.’ आई कौतुकभरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहणार, आंघोळ करून जा म्हणणार. नाइलाजाने आंघोळ करून मी गणपतीशाळेत जाणार. काकांनी बादलीत पांढरी शेड भिजत घातलेली असणार. त्यात पाणी ओतून पातळ-जाड समीकरण जमलं, की काका आम्हांला म्हणणार, ‘चला, रंगवा सावकाश.’ ती पांढरी शेड गणपतीच्या मुकुटापासून खाली पाटापर्यंत फासून घेणं हे आमचं रंगकाम. काका इतरही सटरफटर कामं आमच्याकडून करून घेणार. बदल्यात उरल्यासुरल्या मातीचा छोटासा गोळा आमच्या हातावर ठेवणार.
ब्रह्मांड हाती आल्याच्या आनंदात आम्ही घरी पळणार आणि मग अंगणात बसून त्या मातीचे कावळे-चिमण्या, मोर, उंदीर, बाहुली, देऊळ, गणपती पु­न्हा-पुन्­हा मोडून पुन्­हा-पुन्­हा जोडून काय काय करणार. उ­न्हात वाळत ठेवणार.
ओल्या उकडीच्या करंज्या सगळ्यांच्याच घरी प्रसादाला असणार, पण तळणीच्या करंज्या चुकूनच कुणाच्या तरी घरी. तो रात्रभर चाललेला मोठा कार्यक्रम असणार. आई तळणीच्या करंज्यांचा घाट घालणार, तेव्हा शेजारच्या पाच-सहा बायका मदतीला बोलावणार, त्यातल्या एकीलाही करंजी नीट कशी करावी माहीत नसणार. चपातीसारखी जाड पाती, त्यात पाव-पाव किलो सारण. ही भलीमोठी करंजी. एक खाल्ली तरी पोट टम्म. तळलेली करंजी माझ्यासाठी केवढं मोठ्ठं पक्वान्न. ज्या दविशी करंज्या तळणार, तेव्हा माझी केवढी तरी गडबड. मी जागत बसणार. आईच्या मागेमागे करणार. तळलेली पहिली करंजी खाऊनच झोपी जाणार.
गणपतीचे ते पाच दविस गावभर झांजेची झिन‌झिन, तबल्यावर थापा आणि भजनाचे चढे सूर. सगळीकडे खनखनाट अन् झिनझिनाट. ज्याला भजनात बाजापेटी वाजवता येते, तबला-मृदंग वाजवता येतो, अभंग गाता येतो आमच्या नजरेत तो हीरो. आमच्या घरात तर साक्षात भजनमेळाच होता. वडील छान तबला वाजवायचे. दोघे भाऊपण तबला वाजवण्यात ­िनष्णात. मोठे भाऊ बाजापेटी वाजवणार, सुरेल अभंग गाणार. वसंतभाऊ उत्तम झांज वाजवणार. बाकीचे लहानमोठे साथ देणार. घरच्या घरीच भजन रंगणार. मोठ्या भाऊची तर संगीतमास्तर म्हणून ओळख होती. गणपतीच्या आधी तीन-चार महिने गावोगावच्या भजनीमेळ्यांंना शिकवण्यासाठी त्यांना केवढी डिमांड असणार.
लहानपणी मोठ्या भाऊने मला पेटीच्या सुरावर िन तबला-झांजेच्या ठेकावर एक अभंग गायला शिकवला होता -
‘शविनंदन आले आले, धरणीमाता
कानी बोले...’
उंच स्टँडवर ठेवलेली बाजापेटी. भाऊ खुर्चीवर बसून पायाने ितचा भाता वरखाली करत वाजवत. त्यांच्या बाजूला उभी राहून शेजारपाजारांच्या घरांत भजनमेळ्यात मी अभंग म्हणे - ‘शविनंदन आले आले...’ बाकीचे भजनकरी ते रिपीट करत. एवढ्या मोठ्या लोकांत (भजनमंडळात) मी अभंग म्हणते याचं कोण कौतुक ते अन् केवढी ती माझी मिजास ! शिवाय हक्काचा
उसळीचा पुडा.

गेल्या वर्षी संध्याकाळी अचानक माहेरच्या गणपतीला गेले. लांबून भजनाचे सूर कानी पडले. घरात डोकावले तर चक्क घरचाच भजनमेळा. मोठे भाऊ पेटी वाजवताहेत. त्यांचा मोठा मुलगा सतीश अभंग म्हणतोय. दुसरा मुलगा महेश तबला वाजवतोय. उमेश आणि नातू प्रणवच्या हातात टाळ. लेकी, सुना, नाती, सारी पोटतिडकीने भाऊंच्या मागून भजनाचं ध्रुवपद आळवताहेत. सारं गमतीगमतीनं उत्साहात चाललंय. किती वर्षांनी पुन्­हा तोच घरचा भजनमेळा साक्षात समोर. मी पर्स फेकून थपकन त्यांच्यात बसते. कुणाच्या तरी हातातली झांज काढून घेते. ठेका धरते. ‘छिय्याक छिय्याक छीन.. छीन.. छीन..’ मग सगळेच रंगात येतात. भाऊ म्हणतात, ‘उषे, आठवतो का तुझा तो बालपणातला अभंग? चल कर सुरुवात.’ भाऊंची बोटं सराईतपणे काळीपांढरीवर फिरू लागतात. महेश तबल्यावर थाप मारतो ‘ताक धीना धीन...’ उमेश, सतीश टाळाचा टणकार काढतात. सगळ्यांचा ‘म्हण.. म्हण..’ चा ­निष्पाप आग्रह. माझ्या तनामनातून काहीतरी सळसळत येतं. मागचा पुढचा काहीही विचार न करता, सोबत नवराबविरा असल्याचं भान हरपून, पेटीतबल्याचा तालठेका साफ विसरून गेलेली मी चक्क पंचेचाळीस
वर्षानी भाऊच्या बाजापेटीजवळ बसून अभंगाचा तो जुना सूर लावते - ‘शविनंदन आले ss आले ss..’

भजन आमचंच. ऐकणारेही आम्हीच. घरचं. घराशी. घरापुरतं. अर्थात समोर आमचा गणपती फार समजूतदारपणे आणि सोशीकपणे माझा अभंग ऐकत होता. शेवटी माहेरचाच गणपती ना तो!
ushaparab@yahoo.com