आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOBS: बँकिंग क्षेत्रात लाखो नोकऱ्यांचा पाऊस, काही वर्षांमध्‍ये मिळणार 14 लाख रोजगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात २०२२ पर्यंत १४ लाख लोकांना बँकिंग क्षेत्रात रोजगार मिळू शकतो, असा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या ( नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) अहवालात म्हटले आहे. बँकिंग क्षेत्रात यंदा नियुक्त्यांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आयबीपीएसने सरकारी बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षात १६ हजार ३४४ अधिकारी, ३ हजार ७८४ विशेष अधिकारी आणि ३० हजार ६८३ लिपिकांची नियुक्ती केली आहे. एसबीआय शिवाय अन्य बँका पुढील वर्षीपर्यंत २० हजार अधिकारी आणि ३० हजार लिपिकांची भरती करतील. सरकारी बँकांप्रमाणेच खासगी बँकांतही नेमणुकांची घोषणा होईल. उज्ज्वल भवितव्यासाठी हे आकडे विद्यार्थ्यांचा नक्कीच उत्साह वाढवत असतील.

आयटी अव्वल, वाणिज्य मागे
बँक क्षेत्रातील विविध पदांसाठी बँकांना सर्व विद्याशाखांतील उमेदवारांची गरज भासणार आहे. गेल्या वर्षी पदवीधारकांबरोबरच अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांचा देखील बँकिंग क्षेत्राकडे आेढा वाढल्याचे दिसून आले. बँकिंगकडे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी वळतात, अशी सामान्य धारणा पाहायला मिळते, परंतु वास्तव भिन्न आहे. दरवर्षी प्रशिक्षणासाठी ५० टक्के आयटी, उर्वरित २० टक्के एमबीए, १० टक्के विज्ञान, १० टक्के वाणिज्य आणि १० टक्के कला शाखेचे पदवीधर आमच्याकडे प्रवेश घेतात, असे बँकिंग प्रशिक्षण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आर. जी. अग्रवाल यांनी सांगितले.

वाचा पुढील स्लाइड्सवर एका पदासाठी 1 हजार उमेदवार..