Home | Magazine | Niramay | vaidya vijay kulkarni Summertime diseases and their resistance.

उन्हाळ्यातील आजार आणि त्यांचा प्रतिकार....

वैद्य विजय कुलकर्णी | Update - Apr 24, 2017, 03:08 AM IST

एप्रिल आणि मे महिना म्हणजे उन्हाची तीव्रता अधिकाधिक वाढविणारा काळ. उन्हाळ्याची वाढणारी उष्णता आपल्या आरोग्यावर परिणाम करते. उन्हामुळे आपल्याला अनेक प्रकारचे त्रास जाणवू लागतात.

 • vaidya vijay kulkarni Summertime diseases and their resistance.
  एप्रिल आणि मे महिना म्हणजे उन्हाची तीव्रता अधिकाधिक वाढविणारा काळ. उन्हाळ्याची वाढणारी उष्णता आपल्या आरोग्यावर परिणाम करते. उन्हामुळे आपल्याला अनेक प्रकारचे त्रास जाणवू लागतात. तीव्र उन्हामुळे निर्माण होणाऱ्या आजारांचे स्वरूप व त्यांचा प्रतिकार याचा विचार या लेखामध्ये करायचा आहे. उन्हाळा हा ऋतू आदानकाळ म्हणून समजला जातो. या काळात सूर्य माणसाचे बळ शोषून घेतो व त्यामुळे आपल्या शरीराला थकवा वाटणे, ग्लानी येणे, अशा तऱ्ग्च्या अनेक तक्रारींना तोंड द्यावे लागते. उन्हामुळे कोणत्याही गोष्टीला उत्साह कमी होतो.

  घोळाणा फुटणे : उन्हामुळे अनेक जनांमध्ये आढळून येणारी ही तक्रार असते. नाकातून रक्त येणे यास घोळाणा फुटणे म्हणतात. शरीरातील उष्णता वाढल्याने हा विकार होतो. उन्हामध्ये फिरून आल्यावर नाकातून रक्त येण्याची अनेकाच्या शरीराची प्रवृत्ती असते. घोळणा फुटण्याचा मधून अदून त्रास होत असल्यास त्यावर उपाययोजना करावी लागते. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. नाकातून रक्त येत असल्यास नाकावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी. डोळ्यावर थोडे थंड पाण्याची पट्टी ठेवावी. डोक्यावरवर थोडे थंड पाणी शिंपडावे. यामुळे नाकातून रक्त येणे थांबण्यास मदत होते. दुर्वांचा रस नाकामध्ये टाकल्याने नाकातून रक्त येण्याची प्रवृत्ती कमी होते. त्याचप्रमाणे साजूक तूप नाकात घातल्यासही यामध्ये फायदा होतो. खाण्यामध्ये अति तिखट, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळणे या विकारात आवश्यक असते.
  ज्वर : उन्हामध्ये बाहेरच्या उष्णतेमुळे अंगामध्ये ताप असल्यासारखी जाणीव होते. अंग तापल्यासारखे वाटते. यासाठी वाळ्याची पुरचुंडी अगर मोगर्याची फुले घालून सुगंधित केलेले माठातील थंड पाणी पिण्यासाठी वापरावे. रात्री झोपताना कांद्याचा रस काढून तो पायांना चोळून लावल्यास उत्तम उपयोग होतो.
  अतिशय घाम येणे : काही जणांमध्ये उन्हाळ्यामध्ये खूप घाम येणे अशी तक्रार असते. त्यामुळे घामोळ्यांसारखे विकार उद्भवू शकतात. खूप घाम येण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी चंदानापासून बनवलेले चंदनासव किवा वाळ्यापासून बनवलेले उशीरासव घेतल्यास उपयोग होतो. अतिशय घाम आल्यावर एखादे स्वच्छ वस्त्र थंड पाण्यात ओले करून त्या वस्त्राने सर्व अंग पुसून काढावे.
  डोळ्यांची जळजळ : न्हामुळे डोळ्यांची जळजळ होण्याचा त्रास अनेकांना होतो. अशा वेळेस डोळे बंद करून त्यावर थंड पाण्याची अगर दुधाची पट्टी ठेवावी, रात्री झोपताना तळपायांना साजूक तूप चोळून लावल्यासही फायदा होतो.
  सर्दी पडसे, खोकला : उन्हाळ्यात हे विकारही बऱ्याचदा पहावयास मिळतात उन्हाळ्यात तहान मोठ्या प्रमाणात लागते. बाहेर उष्णता वाढलेली असल्याने आपल्या शरीरात काहीतरी थंड जावे असे वाटत असते. त्यासाठी बरेच जन कृत्रिम शीतपेये, आईस्क्रीम, फ्रीजमधील थंड पाणी याचा वापर अतिप्रमाणात करतात. त्याएवजी शरीरास थंडावा देणारे नैसर्गिक पदार्थ उदा. गुलकंद, मोरवळा, मठातील थंड पाणी यांचा वापर करावयास हवा.
  अतिसार : या दिवसात तीव्र उन्हामुळे शरीरावर परिणाम होऊन अतिसार (जुलाब) होतो. शौचावाटे पातळ पाण्यासारखा मल बाहेर पडतो. यामुळेही अशक्तपणा येतो. यावर पाणी+साखर+थोडे मीठ असे मिश्रण घ्यावे. लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने लाभ होतो. असा त्रास होऊ नये म्हणून उन्हामध्ये जाणे टाळावे. उन्हामध्ये जाणे अपरिहार्य असल्यास टोपी किवा छत्री घेऊन मगच बाहेर पडावे. बाहेरील पाणी पिताना काळजी घ्यावी. कारण दुषित पाणी पोटात गेल्यासही त्रास होण्याची शक्यता असते.
  उन्हामुळे चक्कर येणे : न्हामधून हिंडून आल्यावर एकदम चक्कर येण्याचा त्रास काहींना होतो, अशा वेळेस त्या व्यक्तीस थोडे गारव्यात न्यावे, त्याच्या तोंडावर थंड पाण्याचा हबका मारावा. एवढ्यानेही तो स्वस्थ न झाल्यास वैद्याचा सल्ला घेणे इष्ट होय.
  ayurvijay7@gmail.com

Trending