आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविरत ऊर्जेचं रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्या सगळ्याजणी सध्या काय करत असतील? ज्यांनी १९७५पासून किमान वीसपंचवीस वर्षं तरी आपल्या क्रांतिकारी विचारांनी महाराष्ट्र दणाणून सोडला होता, ज्यांनी महाराष्ट्राला स्त्रीवादी विचारपद्धती आणि जीवनपद्धतीदेखील शिकवली; त्यांना सध्याच्या सामाजिक घडामोडी बघून काय वाटत असेल? त्याविषयी त्या काय विचार करत असतील? त्यांना काय कृती करावीशी वाटत असेल? आज सत्तरी पार केलेल्या अशा अनेकजणी आहेत ज्यांनी एकेकाळी स्त्रीवादी चळवळीत हिरिरीने भाग घेतला होता. भाषणे, लेख, मोर्चे, स्त्रीमुक्ती यात्रा अशा अनेक कार्यक्रमांनी वैचारिक क्रांतीला चालना दिली होती. काही मैत्रिणींनी ‘स्त्री-उवाच’ नावाचा एक स्त्रीवादी प्रकाशनगट सुरू केला होता. या गटातर्फे फक्त स्त्रीवादी विचार मांडणारी पुस्तकंच नाहीत तर ‘स्त्री-उवाच’ नावाचे एक वार्षिकदेखील अनेक वर्षं चालवले जात होते. विद्या बाळ, शारदा साठे, छाया दातार, विजया चौहान आणि त्यांच्यासोबतच्या अशाच आणखीही काही मैत्रिणींनी ऐंशीच्या दशकात माझ्यासारख्या अनेकजणींना एक नवी जीवनदृष्टी दिलेली होती. आज एका बाजूला काही आर्थिक वर्गातल्या स्त्रियांनी सगळ्याच अर्थाने बरोबरी साधली आहे असं चित्र उभं केलं जातं आणि त्याच वेळी देशभरात स्त्रियांवरचे अत्याचार वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. मोकळेपणाने विचार मांडणाऱ्या महिलांविषयी गलिच्छ भाषेत जाहीर धमक्या दिल्या जातात. हुंडाबळी, बलात्कार असे प्रश्न घेऊन ऐंशीच्या दशकामध्ये स्त्रीवादी चळवळ उभी राहिली होती, त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पुन्हा तेच प्रश्न घेऊन नव्याने मोर्चेबांधणी करावी लागते आहे हे पाहून त्या काळात चळवळीत आघाडीवर असलेल्या माझ्या ज्येष्ठ मैत्रिणींना काय वाटत असेल, असा विचार मनात येताेच. 
 
kharevandana@gmail.com
 
पुढील स्लाइडवर वाचा, ज्येष्ठ मैत्रिणींविषयी...
बातम्या आणखी आहेत...