आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यातील वाताच्या आजारांवर ‘बस्ती’ हा एकमेव उत्तम उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात सर्वत्र ओलावा व गारठा वाढतो. त्यामुळे वातदोषात वाढ होऊन शरीरात निरनिराळे आजार उत्पन्न होतात. या ऋतूत शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे खालेले अन्न पचत नाही व शरीर दुर्बल होते. यासाठी पुढीलप्रमाणे नियम आहेत.
*विहार : वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असल्यामुळे दौर्बल्य-कमजोरी आलेली असते. त्यामुळे अतिव्यायाम वर्ज्य करावा. दिवसा झोपणे टाळावे. ओले कपडे घातल्याने फंगल इन्फेक्शन होते. त्यामुळे हे टाळावे.
*वाताचे आजार टाळण्यासाठी : आजार झाल्यानंतरच तो बरा करावा, त्यापेक्षा तो होऊ नये म्हणून आयुर्वेदात विशेष पंचकर्म सांगितले आहे. वाताचे निरनिराळे उदा. सोहोवात, आमवात, गुडघेदुखी व इतर सर्व वर्षा ऋतूत वाढतात. त्याचे निराकरण करण्यासाठी या ऋतूत बस्ती हे पंचकर्म केल्यास रुग्णास वर्षभर त्रास होत नाही. बस्तीमध्ये निरनिराळ्या औषधांच्या काढ्यांचा enema दिला जातो. त्यामुळे शरीरातील सर्व विषारी तत्त्वे बाहेर काढली जातात. शिवाय शरीरातील अन्न शोषण क्रिया सुधारेल. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन-शोषण होऊन नाड्यांची व हाडांची झालेली झीज भरून निघते. vit b चे शोषण सुधारते. हे नसांचे पोषण होण्यासाठी आवश्यक असते. बस्ती म्हणजे केवळ पोट साफ होण्यासाठी घेतलेला एनिमा हा लोकांचा गैरसमज आहे. बस्तीने शरीरातील वाढलेला वातदोष कमी होतो व इतरही बरेच फायदे होतात, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळे वैद्याच्या देखरेखीत वर्षातून एकदा तरी पावसाळ्यात बस्ती करून घ्यावी.
आहार :
* पचण्यास हलका आहार योग्य मात्रेत घ्यावा.
* जेवणात धान्य जुने वापरावे.
* नवीन धान्य वापरू नये, त्यामुळे शरीरात दोष वाढून पचनशक्ती मंदावते.
* ब्रेड, खारी पूर्णपणे वर्ज्य करावे.
* दही खाल्ल्याने त्रास वाढतो, परंतु गोड ताक मात्र घ्यावे.
* स्वयंपाकामध्ये हिंग, सुंठ, मिरे, जिरे, लिंबू यासारखी अग्नी दिपन व पाचन करणारी औषधी ठेवावी; जेणेकरून शरीराचा अग्नी वाढून इतर आजार नष्ट करायला मदत होईल.
* तूप जास्त प्रमाणात खावे. यामुळे वात-पित्ताचे शमन होते.
* मांस खाणे टाळावे. वर्षा ऋतूत मद्यपान टाळावे.
* आहार कमी घ्यावा, उपवास करावा. त्यातही बटाटे, साबुदाणा यांचा वापर टाळावा.


gautamjogad@gmail.com