आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाता जाये बंजारा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लमाण-बंजारा हा तसा आदिम भटका समूह. इंग्रजांनी यांना गुन्हेगार जमातीत लोटले आणि मालवाहतुकीबरोबरच जगाला जोडणाऱ्या विविध संस्कृती, विचार, तत्त्वज्ञान आदींची ने-आण करून जगातल्या सत्य, शिव आणि सौंदर्याची एक मिश्र संस्कृती जन्माला घालण्यात मोलाची मदत करणाऱ्या या लोकसमूहाची आजवर न भरून निघालेली हानी झाली.

थोडेसे मागे वळून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अवघे जगच भटके राहिलेले आहे. ती माणसांची मूळ प्रवृत्तीही आहे. यातूनच संपूर्ण जगाचा शोध लागलेला आहे आणि जग जवळ येऊन विश्व समाजाची एक इंद्रधनुष्यी वीणच विणली गेली आहे. हे नानाविध रंग जगभरातल्या अनेक संस्कृतींची देणगी आहे. यातूनच जन्माला आलेले ‘धरतीला माय आणि आकाशाला बाप’ मानून चालणारे, जिप्सी, बंजारे(Nomads), झोर्बन आदी निसर्गानुरूप ज्यांना जिथे जसे पर्यावरण भेटले, तिथे त्यांनी तसे रूप अंगीकारले. त्यातूनच त्यांची संस्कृती, तत्त्वज्ञान आकारास आले. अपवाद वगळता त्यांना इतिहासात कुणाशी कुठल्याच वैरभावातून युद्ध करावे लागले नाही. वा त्यांनी स्वत:ला कुठल्याच ठरावीक चौकटीत बांधून घेतले नाही. म्हणून ही त्यांची ‘कलरफूल’ संस्कृती जन्मास आली. अन्यथा कुणी काळा, पांढरा, निळा, भगवा, हिरवा, लाल अशा रंगात अडकून आपलं अस्तित्व संपवून बसले असते.

खरं तर माणसाकडे आज कल्पनेतल्या स्वर्गापेक्षा प्रत्यक्ष वास्तवात कितीतरी अधिक पटीने जगण्याला पुरून उरतील, एवढी सुखं असताना वंश आणि धर्म श्रेष्ठत्वाच्या तथा वर्चस्वाच्या लढाईत, या सर्व सुखांवर विरजण पडतंय की काय, असं निर्माण होत असलेलं भयकारुण्यमय चित्र जाणकारांना, करुणेची आराधना भाकणाऱ्यांना व्यथित करीत आहे. या पार्श्वभूमीवर माणसाच्या अस्तित्वासाठी जनकल्याणाची गीते गाणाऱ्या लमाण बंजाऱ्यांची आठवण झाल्यावाचून राहात नाही.

भारतात लमाण, लमाणी, बंजारा, गोर, गोरमाटी, लम्बाडा, चारण वनजारा, सुगाली, सार्थवाह, गवारीचा, ग्वार, बाजीगर आदी नावाने परिचित असलेले पाकिस्तान, अफगाणिस्तानचे कबीलेवाले (आदिवासी) बंजारे यांपासून जगभर पसरलेल्या रोमा जिप्सीपर्यंत त्यांची ओळख सांगता येईल. या संपूर्ण वाटचालीत आदिम काळापासून लमाण-बंजारांनी स्वत:ला कुठल्याच धर्मात बांधून घेतले नाही वा त्यांना तसे बांधताही येणार नाही. मानवता हीच त्यांची जात आणि हाच त्यांचा धर्म. किती विलक्षण स्वरूपाची गोष्ट आहे ही. या लोकसमूहाबद्दल मानववंशशास्त्राचे तथा आदिवासींचे ऑस्ट्रेलियाचे अभ्यासक वॉन फ्युटर हेमिंड्राफ म्हणतात, ‘दुसऱ्या आदिवासी जमातींच्या तुलनेत बंजारांनी कोणत्याही विशिष्ट भूप्रदेशात स्वत:ला अडकवून घेतले नाही. ते जिथे गेले, त्या भूमीलाच त्यांनी आपले मूळ स्थान मानले.’ कदाचित यामुळेच लमाण बंजारांची संस्कृती सर्वधर्मसमभावाची तयार होऊ शकली, असे म्हणावे लागेल. मुस्लिम राष्ट्रात मुस्लिम बंजारा, हिंदू राष्ट्रात हिंदू आदिवासी, पश्चिमी राष्ट्रात ख्रिश्चन जिप्सी, बुद्ध काळात बुद्ध विचारांचे, आणि नानकांच्या काळात त्यांच्या विचारांचे ते प्रसारक झाले. यातूनही त्यांनी आपली आदिम प्राकृतिक विचारधारा जोपासत, मानवी विचारांना सत्य मानून आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान निर्माण केले. त्याचेच अंश आजही या लोकसमूहाच्या विचार परंपरेत सापडतात. उदा. ‘शरण आलेल्याला मरण द्यायचे नाही.’ ‘मुयेन मटी जिवतेन बाटी’, ‘जात खोट रीत मोट’, इत्यादी सांगता येतील.

कदाचित या लोकांना जगभराच्या भटकंतीतून ही गोष्ट कळून चुकली असेल की, धर्म हा आदर्श जीवन प्राप्तीचे साधन आहे, अंतिम साध्य नाही. ती आदर्शवत आणि आनंदमय जीवन जगण्याकरिता बनलेली एक सांस्कृतिक संकल्पना आहे. अंतिम उद्दिष्ट मानवी जीवनाचे अस्तित्व अबाधित ठेवणे हे आहे. जे बंजारे आदिम काळापासून गात आले आहेत. ‘धरती तोपर अंबर रकाड जिवणों’ अर्थातच, धरतीवर जीवनाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी, माणसांचे कूळ तारण्यासाठी ते आजवर एक गोष्ट सांगत आलेत. ‘चोको पुरादं जग मोतीयारो, कुळेतारण’ म्हणजे, मानवी कूळ तारण्यासाठी चाक फिरतं राहू दे. हे जग मोत्यासमान आहे. (कुळी आवं, कुळी जावं, कुळी मांयीजग समावं) कुळं येतात, कुळं जातात, यातच जग सामावलंय. ते तारण्यासाठी (नंदीनालारी, झाडे पाडेरी, साती मातारी, चांदा सूर्यारी, धरती. मातारी, हुबे गावणीयारी, सेवा नायकेरी) नदी-नाल्यांची, झाड-पहाडांची, सप्तमातृकांची, चंद्र-सूर्याची, धरती मातेची, लोकगायकांची, लोकनायकांची आरती गात आलेत. यातूनच जन्मास आलाय, ‘सेनं सायी वेस’ सर्वांचं कल्याण कर म्हणणारा, करुणा आणि सद््भावनेचा आर्त सूर.

बंजारांच्या बहुतांश विधी, पूजा, उत्सवांच्या प्रसंगीही ‘आरदास’ म्हटले जाते. स्त्री-पुरुष, लहान-मोठे, मुलगा-मुलगी असा कुठलाच भेद न करता सर्व समान आहेत, असे मानून सर्व जण सोबत प्रार्थना गातात. या वेळी जल, जमीन, जंगल आणि अग्नी यांची आराधना करतात. इथे आणखी एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी आहे ती म्हणजे, (जांगड भेळेर वात) इतरांना सामावून घेण्याची प्रक्रिया. आज आपण पाहतो, माणसं जातीतून बाहेर टाकली जातात; पण बंजारांनी आपल्या मुली देऊन, इतर जातीयांना आपल्यात सामावून घेतल्याची अनेक उदाहरणे देता येतील. या मातृसत्ताक परंपरेतल्या स्त्रियाही सत्याची बूज राखताना दिसतात. ‘सत मत छोडो सतीया पतीया पत जायं, सतेरी बांधी लचमी फेर धरेन आयं’ अशी सत्याची महती गाताना अनेक मौक्तिके कानी पडतात. या विचाराच्या वारशातूनच संस्कार पावलेले संत सेवालाल हे विचारी पुरुष ‘स्वत:ची ओळख स्वत: करून घ्या. कुणीच कुणापेक्षा मोठा नाही, लहान नाही. खोटी कामे करू नका आणि स्वत:च्या बळ आणि क्षमतांवर विश्वास ठेवा.’ असे निरूपण करतात. जे अनादी काळापासून तथागत बुद्धांच्या ‘भवतु सब्ब मंगलम‌्’, ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:’ वा संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदान’ आदींतून पाझरत राहिलेलेच आहे.

शेवटी एवढेच सांगता येईल की, आमच्या नजरेत भलेही बंजारांसारख्या आदिवासी जमाती अशिक्षित, रानटी असतील; परंतु त्या कधीच अज्ञानी वा असंस्कृत नव्हत्या. त्यांनी आपली आदर्श जीवनपद्धती निर्माण केली होती. निसर्ग आणि मानवाप्रती ते अत्यंत संवेदनशील होते, आहेत. आमच्यासारखी ओरबाडून घेण्याची त्यांची नियत खचितच नव्हती. हे आदिम संचित आजही दिशा भरकटलेल्या जगाला उपयुक्तच आहे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये.

हे माता
हिरव्या राईची आई
जन्मापासून मृत्यूनंतर सामावलेली
तुझ्या स्मरणाचा जागर घालतोय
तुझ्या नावाने घास भरवतोय
त्याचा स्वीकार कर
आणि सर्वांचं कल्याण कर…
तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे
मनी बांधलेली गोष्ट ध्येयाला जाऊ दे
सेराचं सव्वासेर होऊ दे
धरणीला धान्याने सजव
तिची ओटी भर
कामाला फळ येऊ दे
घरी दारी नांदू दे समृद्धी
भल्यांशी भेट घडव
आणि सर्वांचं कल्याण कर…
डोक्यात अंधार भरलेली आम्ही माणसं
पावला-पावलांवर अडकतो, थांबतो
आमची वाकडी वाट सरळ कर
भले भले शस्त्रांचे साम्राज्य गळून पडतात
दुनिया दु:खाने भरलेली आहे
सर्वांच्या वाट्याला सुखं येऊ दे
आम्ही जे काही आहोत तुझेच आहोत
आमचं जे काही आहे तेही तुझंच आहे
चुकलो माकलो तर पोटात घे
आलेली विघ्नं दूर सार
हजार कोसांची मारतो आम्ही खेप
निरर्थक ठरु देऊ नकोस
आणि सर्वांचं कल्याण कर…
जिथे स्मरू तिथे तुझा आढळ असावा
मोडून पडलेल्यात सामर्थ्य आण लढण्याचं
सुरळीत चालू दे दिनचर्या
राख उचलू ती पाक होऊ दे
संपलं सारं जरी नव्या कोंबांना जीव धरू दे
रात्रीचे चारही प्रहर तुझेच आहेत
दिवसाचे चारही प्रहर तुझेच आहेत
बागबगीचे फुलं फळं फुलती राहू दे
वांझ गायीचीही असू दे सोबत
दोन पायांच्या जिवांचं कल्याण कर
चार पायांच्या जिवांचं कल्याण कर
आस आहे तिथे जिवंत ठेव भरवसा
आणि सर्वांचं कल्याण कर…
गोर गरिबांचं कल्याण कर
वाड्या वस्त्यांचं कल्याण कर
निर्जीवांचंही अस्तित्व ठेव
जीवजंतू जनावरांचंही कल्याण कर
फुला मुलांचं कल्याण कर
सर्वांची स्वप्नं फळाला येऊ दे,
जाऊ दे ती ध्येयाला
आणि सर्वांचं कल्याण कर…

लमाण आरदास
संकलन आणि मराठी अनुवाद – वीरा राठोड

वीरा राठोड
veerarathod2@gmail.com
बातम्या आणखी आहेत...