आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Its tea time... असा करावा अहाहाsss चहा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की गरमगरम चहा, गाडीवरची भजी खाण्याचा मोह कुणाला आवरत नाही! उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळलेले लोक पावसाळ्यात हमखास गरम पेयाकडे वळतात. पावसाळ्यात चहा पिणे किंवा तत्सम गरम पदार्थ सेवन करणे हे आरोग्यास हितकरच ठरते.

उन्हाळ्यामध्ये शरीरास प्राकृतरीत्या दुर्बलता येऊन जठराग्नी मंदावतो व परिणामी पावसाळ्यात भूक कमी लागते व वाताचे विकार वाढतात. पावसाळ्यामध्ये पाणी व पेय सेवन करताना विशिष्ट काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यातील नदीचे, विहिरीचे, तलावाचे पाणी पचावयास जड असते व पावसाळ्यामुळे त्यात माती व गाळ मिसळून ते दूषित होते. त्यामुळे पावसाळ्यात जलसेवन करताना शक्यतो ते कोष्ण (कोमट) सेवन करावे, किमान ते प्राकृत तापमानाचे असावे व अतिशीत जलपान टाळावे. बरेच लोक पाणी सकाळी उकळून ठेवून दिवसभर ते सेवन करतात. असे करणे चुकीचे ठरते. कोष्ण जलसेवन याचा अर्थ जलसेवन करताना ते कोमट करून सेवन करावे. त्याचप्रमाणे पाणी गरम करताना त्यावर झाकण ठेवू नये. पावसाळ्यातील पाणी दूषित असते त्यासाठी जलशुद्धीकरण उपकरणाचा वापर करणे योग्य ठरते.