आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vetarnary , Cattle Development Bachalor Degree Syllabus

पशुवैद्यक, पशुविकासविषयक पदवी अभ्यासक्रम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्हेटर्नरी कौन्सिल ऑ फ इंडियातर्फे पशुवैद्यक व पशुविकासविषयक पदवी अभ्यासक्रमाच्या 2013 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणा-या प्री व्हेटर्नरी टेस्ट : 2013 या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

*आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांवर उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

*निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 11 मे 2013 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत घेण्यात येईल.
अर्जदारांनी बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड पात्रता परीक्षेतील गुणांकांच्या आधारे त्यांची देशांतर्गत संबंधित कृषी विद्यापीठ वा पशुवैद्यक संस्थेत पशुवैद्यक वा पशुविकास विषयातील पदवी अभ्यासक्रमाच्या 2013 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यात येईल.
*अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी 1550 रु.चा (राखीव गटाच्या उमेदवारांनी 800 रु.चा) व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंतीअर्ज व स्वत:च्या नाव आणि पत्ता लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या विनंतीअर्जासह संस्थेच्या कार्यालयात 8 फेब्रुवारी 2013 पर्यंत पाठवावा.

*अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 22 ते 28 डिसेंबर 2012च्या अंकात प्रकाशित झालेली व्हेटर्नरी कौन्सिल ऑ फ इंडियाची जाहिरात पाहावी.

*अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज ऑफिस ऑफ कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स, व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया, ‘ए’ विंग, दुसरा माळा, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली-110 066 या पत्त्यावर 15 फेब्रुवारी 2013 पर्यंत पाठवावेत.