आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्धर आजारावर अशी केली मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चमक निघून सुजलेला गुडघा ऑपरेशनशिवायच बरा झाला
मी एसटी बसमध्ये चढत असताना माझ्या गुडघ्यात अचानक काहीतरी आवाज झाल्याचे जाणवले व चमक येऊन गुडघा दुखू लागला. पूर्ण गुडघ्याला प्रचंड सूज आली आणि असाह्य वेदना सुरू झाल्या, मला चालता येत नव्हते, उठता-बसता येत नव्हते. तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले तेव्हा एका गुडघ्याच्या शिरेला इजा झाल्याचे निदर्शनात आले. त्यांनी गुढघ्याचे ऑपरेशन हा एकच पर्याय आहे असे सांगितले. सर्वसाधारण परिस्थिती असल्याने ऑपरेशन शक्य नव्हते त्यासाठी येणारा खर्च शक्य नव्हता, ऑपरेशन टाळावे म्हणून बऱ्याच ठिकाणी दाखवले, परंतु काहीच फायदा झाला नाही. आमच्या गावातील एक सद‌्गृहस्थ दत्तू निकम भेटले त्यांनी मला औरंगाबादच्या एका होमिओपॅथिक डॉक्टरांचा पत्ता दिला आणि एकदा त्यांच्याकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला. आम्ही लगेच दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांकडे आलो आणि उपचार सुरू केले, त्यांनी सर्व विचारपूस केली आजाराची सुरुवात कशी झाली त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन आठ दिवसांचे औषध दिले. डॉक्टरांनी दिलेली औषधी सांगितल्याप्रमाणे घेण्यास सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी मला चालता येऊ लागले आणि हळूहळू माझ्या गुढघ्यातील वेदनादेखील कमी झाल्या. आता तीन वर्षे झाले मला कुठलाही त्रास नाही, कुठलीही गोळी नाही आणि मी रोज दोन किलोमीटर चालते. मी दत्तू निकमची व त्या होमिओपॅथी डॉक्टरांची खूप खूप आभारी आहे. तुम्हालाही असा प्रॉब्लेम असल्यास एकदा तरी होमिओपॅथी उपचार करून बघा, नक्की बरे व्हाल.
सलाबतपूर,ता. नेवासा,
जि. अहमदनगर, मो. ९७६३०५४६३२
बातम्या आणखी आहेत...