आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायक-नायिकेचे प्रम... (वैद्य विजय कुलकर्णी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखांकात नायकाने कोणत्या स्त्रीशी विवाह करावा आणि कोणत्या स्त्रीशी करू नये, याबद्दल वात्स्यायनाने केलेले मार्गदर्शन आपण पाहिले. त्याचप्रमाणे पती-पत्नींचा संसार सुखी होण्यासाठी पतीने नेमके काय करावे, याचेही ‘कामसूत्र’काराने केलेले दिशादर्शन त्या लेखात पाहिले. यापुढील ‘बालोपक्रमन’ या प्रकरणात वात्स्यायन सांगतो की, नायिकेला प्रसन्न करण्यासाठी तिच्या आवडीप्रमाणे त्या नायकाने तिच्याशी योग्य असे वर्तन ठेवावे. उदा. तिला खेळ आवडत असल्यास तिच्याशी खेळ खेळावे. तिला एखाद्या कलेमध्ये रस असल्यास, त्या कलेत नायकाने रुची दाखवावी किंवा तिला संगीत आवडत असल्यास नायकाने मधुर असे संगीत तिला ऐकवावे.

वात्स्यायन पुढे सांगतो की, कोजागरी, बहुला अष्टमी, तसेच कौमोदी महोत्सव अशा विविध उत्सवांच्या निमित्ताने, त्या नायिकेला विविध वस्त्रे तसेच अलंकार प्रदान करून प्रसन्न करावे. नायिकेला तिच्या मैत्रिणीने कामसंबंधी कलेचे शिक्षण द्यावे. नायकाचे राहणीमान हे चांगल्या पद्धतीचे म्हणजेच टापटीप असावे. त्याने नायिकेच्या नजरेसमोर सतत असावे. अधिकाधिक नायिका या परिचित आणि जवळ राहणाऱ्या युवकांना पसंत करतात. परंतु लाजेखातर त्या अशा युवकांशी समागम मात्र करीत नसल्याचे निरीक्षण ‘कामसूत्र’कार येथे स्पष्टपणे नोंदवतो. नायिका लाजेखातर नायकांशी नजर मिळवत नाही, पण संधी मिळताच दुरून ती त्याच्याकडे कटाक्ष टाकते. यानंतर वात्स्यायानाने नायिकेचे आणि तिच्या हावभावांचे सविस्तर वर्णन याच अध्यायात केले आहे.

यानंतर कन्येचे तीन प्रकार ‘कामसूत्र’कार या प्रकरणाच्या शेवटी सांगतो. ते तीन प्रकार म्हणजे बाला, तरुणी आणि प्रौढा असे आहेत. यामधील बाला ही क्रीडाप्रेमी असते तर तरुणी ही कामप्रेमी असते आणि प्रौढा ही वात्सल्यप्रेमी असते. नायकाने यामधील नायिका शोधताना कन्येच्या त्या त्या अवस्थेत तिला आवडणाऱ्या त्या वयातील उपक्रम करून वशीभूत करावे, असे मार्गदर्शन ‘कामसूत्र’काराने येथे केले आहे. या बालोपक्रमन प्रकरणानंतर कामसूत्रात एकपुरुषाभियोग नावाचे प्रकरण वात्स्यायनाने सांगितले आहे. यामध्ये नायकाने नायिकेशी करावयाच्या विविध क्रीडांचे, खेळांचे वर्णन सुरुवातीस केले आहे. तसेच आलिंगनाचे चार प्रकारही वर्णन केले आहेत. त्याचप्रमाणे नायिकेला करावयाच्या विविध प्रकारच्या प्रेमळ आणि हळुवार स्पर्शांचेही वर्णन पुढे ‘कामसूत्र’कार करतो. आपली सुखदु:खे आणि आपल्या मनातील भाव या दोघांनीही एकमेकांना विविध प्रकारांनी सांगावेत, असेही तो पुढे सांगतो. विविध खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम बघताना नायकाने नायिकेजवळ बसावे, असेही तो सुचवतो. त्यानंतर तिला हळुवारपणे स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. विशेष करून तिच्या कोमल पायांना आपल्या पायाने स्पर्श करावा. आणि तिच्या बोटांमध्ये आपली बोटे अडकवण्याचा प्रयत्न करावा. नायिकेने याला आक्षेप न घेतल्यास नायकाने आपल्या पायाने तिच्या पायांवर हळुवारपणे दाब द्यावा. पाणी पिताना त्यातील थोडे पाणी तिच्यावर शिंपडावे. जर ते दोघेही एकांतात असले किंवा अंधारात असले, तर नायकाने नायिकेच्या विविध अंगांना स्पर्श करावा. आणि ते एकाच पलंगावर असले, तर पूर्वी सांगितलेल्या नखक्षताचा उपयोग करावा. नायिकेला या सर्व प्रकारात उद्विग्न होऊ देऊ नये. एकांत मिळाल्यावर नायकाने नायिकेशी संवाद साधावा. युक्तीने बोलावे आणि त्याचा परिणाम अनुभवावा. नायिकेशी त्याने गप्पा वाढवाव्यात, नायिकेबरोबर सर्व प्रयोग यशस्वी झाल्यावर तिच्याशी संभोग करावा.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, संभोगाच्या वेळा...
बातम्या आणखी आहेत...