आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vikramsingh Parihar Artical On Recovery From Disease

दुर्धर आजारावर अशी केली मात ... अन् नैसर्गिक प्रसूती झाली !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी श्री विक्रमसिंह परिहार, राहणार दर्यापूर जिल्हा अमरावती. मला आपणास सांगण्यास खूप आनंद होतो की, आजी आजोबा होणे हे सुख संसारातील इतर सुखापेक्षा वेगळे आहे. जेव्हा आम्हाला माहिती मिळाली की आमची मुलगी आई होणार आहे तेव्हा आम्ही सर्व आनंदित होतो. सगळे काही व्यवस्थित सुरू असताना सातव्या महिन्यात डॉक्टरकडे तपासणीस नेले असता त्यांनी सांगितले की गर्भाशयातील पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, आणि बाळाचे वजनदेखील खूप कमी आहे. तेव्हा डॉक्टरने तिला आठवड्यातून दोन सलाईन देऊन पाणी वाढवण्याचा सल्ला दिला, मात्र हे पण सांगितले की या उपायाने आपल्याला फक्त 20% फायदा होईल. जर पाणी वाढले नाही तर बाळाला धोका होऊ शकतो त्याची खूप काळजी घ्यावी लागेल गरज पडली तर लवकर दिवस पूर्ण होण्याआधी प्रसूती करून घ्यावी लागेल. जर असे काही झाले तर बाळाला काचेच्या खोलीत ठेवावे लागेल. जर प्रसूती करून घेताना काही अडथळे आले तर शस्त्रक्रिया करून प्रसूती करावी लागेल. तेव्हा आम्ही खूप चिंतित झालो, पण तेव्हाच दिव्य मराठीला होमिओपॅथीच्या एका रुग्णाचा अनुभव वाचला आणि त्यांच्याकडून एका होमिओपॅथीतज्ज्ञाचा पत्ता मिळाला ज्यांच्यापासून त्यांना फायदा झाला होता.
आम्ही त्या डॉक्टरांकडे संपर्क केला त्यांनी माझ्या मुलीची पूर्ण माहिती घेतली आणि उपचार सुरू केले. डॉक्टरांनी दिलेले औषध नियमित सांगितल्याप्रमाणे घेतले आणि आठ दिवसांनी सोनोग्राफी केली आणि रिपोर्ट एकदम नॉर्मल आला, गर्भाशयातील पाणीपातळी ब-यापैकी वाढली व बाळाचे वजनदेखील वाढले. हे आमच्या डॉक्टरांला जेव्हा दाखवले असता त्यांना पण आश्चर्य वाटले की होमिओपॅथी औषधाने असे होऊ शकते. आम्ही पूर्ण नऊ महिन्यांपर्यंत होमिओपॅथी औषध घेतले, होमिओपॅथिक डॉक्टरांनी त्यानंतर नवव्या महिन्यात काही वेगळ्या औषधी दिल्या ज्याने माझ्या मुलीला प्रसूतीच्या वेळेस खूप फायदा झाला आणि प्रसूतीदेखील नैसर्गिक झाली. बाळदेखील व्यवस्थित आहे. मी होमिओपॅथीचा आणि दिव्य मराठीचा व होमिओपॅथिक डॉक्टरांचा खूप खूप आभारी आहे, जर दिव्य मराठीमध्ये असे अनुभव मला वाचण्यास मिळाले नसते तर आम्ही कदाचित अडचणीत सापडलो असतो कारण मला होमिओपॅथीबद्दल इतके काही माहीत नव्हते आणि इतक्या अवघड समस्यावरदेखील होमिओपॅथीमध्ये उपचार असतात हे प्रथमच अनुभवले.