आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilas Gavaskar Article About Mba Pharama In Marathi

एमबीए फार्मा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करिअर निवडताना बहुतांश वेळेला संभ्रम निर्माण होतो हे करू का ते करू ? काय चांगलं आणि काय वाईट? अशा वेळी सांगावेसे वाटते की चांगले किवा वाईट असे काहीही नसते. आपण कुठल्या क्षेत्रात फिट बसतो हे बघणे महत्त्वाचे असते. बर्‍याच जणांना प्रश्न पडतो की, डीफार्म केल्यानंतर किंवा बीएस्सी र्नसिंग केल्यानंतर एमबीबीएससाठी प्रवेश मिळू शकतो का? तर उत्तर एकच आहे की, एमबीबीएससाठी बारावी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी पात्र ठरू शकतो शिवाय एंट्रन्स टेस्ट मग ती नॅशनल असो वा स्टेट द्यावीच लागते. रोगाचे निदान करणे ही एक स्वतंत्र विद्याशाखा आहे.

रोगावरील औषधे तयार करणे ही एक स्वतंत्र शाखा आहे आणि निर्माण केलेली औषधे व्यवस्थितपणे ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे एक स्वतंत्र करिअर होऊ शकते.

एमबीबीएस हा एंट्रन्सशिप धरून अंदाजे पाच वर्षांचा कोर्स आहे. पुढे स्पेशलायझेशन वा सुपर स्पेशलायझेशनची काळानुरूप गरज आहे. त्यामुळे जवळपास आठ-नऊ वर्षे काळ जातो. बीएस्सी किंवा डीफार्मा झाल्यानंतरही एवढाच वेळ लागतो कारण वैद्यकीय परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा देऊनच प्रवेश मिळू शकतो. फार्मसी मॅनेजमेंट हे नवे करिअर आहे. त्याचा स्कोप बघूयात. एमबीए फार्मा किंवा फार्मास्युटिकल मॅनेजमेंट हा कोर्स गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये सुरू झाला आहे. आपल्या बुद्धिकौशल्यांचा, गुणांचा कस लागणारा हा कोर्स म्हणजे खरोखरी मेहनती आणि हुशार मुलांसाठी एक आव्हानच आहे. पूर्णवेळ फार्मसी सायन्स, लाइफ सायन्सेस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीएस्सी, बायोसायन्सेस, बीटेक, बी. ई. बायोटेक्नॉलॉजी अशा कुठल्याही शाखेचा पदवीधर त्यासाठी पात्र ठरू शकतो. मात्र यूजीसी मान्यताप्राप्त पूर्णवेळ अभ्यासक्रमांतर्गत ज्यांनी पदवी घेतली आहे केवळ अशा विद्यार्थ्यांसाठीच हा कोर्स आहे.

मुंबईत नरसी मोनजी इन्स्टिट्यूटमध्ये हा दोन वर्षांचा कोर्स सुरू असून या कोर्समध्ये फार्मास्युटिकलमध्ये मूलतत्त्वे, इलेक्ट्रॉनिक्स, फायनान्स, मार्केटिंग, अकाउंटंट, मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्कील इत्यादी भाग शिकवला जातो. शिवाय विद्यार्थ्यांना स्पॅनिश व चिनी भाषेचेही प्रशिक्षण दिले जाते.

चीन व ब्राझील येथील औषधांच्या बाजारपेठांसाठी हे ज्ञान आवश्यक मानले जाते. या कोर्समध्ये प्रत्येक आठवड्यात एक दिवस हा खास फिल्डवर्कवर घालवावा लागतो. तज्ज्ञ डॉक्टर, पेशंट्स, फार्मासिस्ट किंवा औषधांच्या कारखान्यात जाऊन प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सोय केलेली असते. त्यामुळे एन.एम.आय. एम. एस. सारख्या संस्थेमधून जर तुम्ही हा कोर्स केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. या कोर्सची फी सात लाख रुपये आहे. 2014-15 साठी एनमॅट ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. चाचणी परीक्षा पास झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना केस डिस्कशन, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीतून प्रवेश दिला जातो. याच संस्थेमधून बारावीनंतरचा एमबीए कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. एनएमआयएमएसच्या वेबसाइटवर संपूर्ण तपशील उपलब्ध आहे.