आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilas Gavraskar About Hopes, Divya Education, Divya Marathi

आशेचा किरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिळालेले गुण आणि खरी अंगभूत गुणवत्ता यांचा संबंध फारसा नसला तरीसुद्धा जगण्यासाठी आपल्याला ‘मार्क्सवादी’ होण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजेच ज्याला जास्त मार्क्स मिळाले तो पुढे जाणार हे पटत नसलं तरी सत्य मान्य करावेच लागेल. ज्या विद्यार्थ्यांना दुर्दैवानं कमी मार्क मिळालेत त्याची अवस्था मात्र फारच वाईट होते. ना मनासारख्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेता येतं ना आवडीचं कॉलेज आणि वर इतरांकडून होणारी मानसिक अवहेलना वेगळीच. अशा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आशेचा किरण निश्चितच आहे. त्यांनी अजिबात निराश न होता पुन्हा जोमाने तयारीला लागयचं. परीक्षेच्या काळातील चुकांचा फेरविचार करून, आत्मपरीक्षण करून, थोडेसे तंत्र बदलून पुन्हा तयारी करावी. हताश किंवा निराश होऊन वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. कारण आता वेळ आपण बदलू शकत नाही, पण वेळेवर प्रयत्न निश्चितच करू शकतो. बहुतेक विद्यार्थी पुन्हा रिपीट करण्याचाही विचार करतात. म्हणजे वर्षभर गॅप घेऊन मार्क वाढविण्यासाठी पुन्हा परीक्षा देतात. असं करायलाही हरकत नाही पण संभाव्य काही त्रुटींचा, शिक्षण पद्धतीतील दोषांचा, प्रश्नपत्रिकांतील चुका, शिक्षकांच्या संपामुळे निकालाची दिरंगाई, कॉपी प्रकरणामुळे फेरपरीक्षा यासारख्या गोष्टी बरोबरच स्वत:मध्ये आकलन क्षमता, अभ्यासाची सुद्धा शारीरिक, मानसिक अपेक्षा यांचा विचार केला जावा. आता ज्यांना तुलनेने कमी मार्क मिळालेत आणि पारंपरिक चाकोरीतील महाविद्यालयामध्ये प्रवेशाविषयी साशंकता आहे अशा गुणी विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध आहेतच. भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयाच्या तंत्रज्ञान विकास केंद्रामार्फत अर्धवेळ काही डिप्लोमा कोर्सेस चालवले जातात. चार वर्षांच्या कालावधीचे हे कोर्सेस एआयसीटीई प्रमाणित आहेत. डिप्लोमा इन टूल अँड डायमेकिंग आणि डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन इन ग्राफिक्स असे हे कोर्स असून दहावीमध्ये कमीत कामी 55 टक्के गुणांची पात्रता आवश्यक आहे. एससी, एस.टी. अशा राखीव जागांकरिता हीच अट 45 टक्क्यांची आहे. चार वर्षांच्या या कोर्सची फी प्रतिवर्षी 40 हजार रु. एवढी असून हे अत्यंत उपयुक्त कोर्सेस आहेत. पुन्हा नोकरीच्या देखील संधी उपलब्ध आहेत. मात्र येथे प्रवेश घेण्याआधी एक सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तेव्हा तुलनेने कमी गुण मिळालेल्या किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता स्वत:मधील गुणांच्या कौशल्यांचा योग्य वापर करून अधिक मेहनतीने आणि चिकाटीने स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. इथे हुशारीचा कस लागू शकतो.
(vilasgavraskar@yahoo.co.in)