आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilas Gavraskar Article About Heritage Career, Divya Marathi

‘हेरिटेज’ करिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात सर्वच स्तरांवर झपाट्याने बदल होत आहे. आपल्यापुढे रोज नवनवी आव्हाने येत आहेत. नव्या गोष्टींचे स्वागत करतानाच जुन्या पण चांगल्या गोष्टींचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच मानवनिर्मित असो किंवा निसर्गनिर्मित, अत्यंत दुर्मिळ गोष्टींचा वारसा पुढच्या पिढीच्या माहितीसाठी, अभ्यासासाठी जतन करून ठेवणं ही आजच्या काळाची गरज झाली आहे. आणि त्यातून युवकांना नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. औरंगाबाद येथील वेरूळ लेणी असो किंवा आग्रा येथील ताजमहाल संपूर्ण जगाच्या नकाशात आज ही स्थळं एक ऐतिहासिक वारसा म्हणून प्रस्थापित झालेली आहेत. देशोदेशीच्या पर्यटकांना ही ठिकाणे आकर्षून घेत आहेत. त्यामुळे त्यांचे महत्त्व अबाधित आहे. भारतामधील अशी अनेक शहरे व गावे आहेत की जेथे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन स्वरुपाच्या ऐतिहासिक गोष्टी आहेत. यांना ‘हेरिटेज’ या नावाखाली संबोधले जाते.

या ठिकाणांची जपणूक, संवर्धन यासाठी कुशल तरुणांची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्रांची (युनो) शैक्षणिक, शास्त्रीय, सांस्कृतिक परिषद म्हणजेच ‘युनेस्को’चे जाळे जगभरामध्ये पसरलेले आहे. युनेस्कोचे कार्य ‘हेरिटेज’च्या माध्यमातून सांस्कृतिक, शैक्षणिक, शास्त्रीय प्रगती आणि सामाजिक विकास हे आहे. पदवीधर युवकांना तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी युनेस्को आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगल्या संधी देते. इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र अशा विविध क्षेत्रांच्या सखोल अभ्यासाबरोबर ज्या युवकांना अकाउंट्स, फायनान्स किंवा पब्लिक रिलेशन्ससारख्या विषयांमध्ये गती आहे अशा विद्यार्थ्यांसाठी देखील संधी उपलब्ध आहेत. शिवाय मार्केटिंग, मासमीडिया, वेबसाइट किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा ह्युमन रिसोर्स यासारख्या गोष्टींनासुद्धा खूप वाव आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल गार्डन्स, राजमहाल, ऐतिहासिक वास्तू तसेच प्राणिसंग्रहालय इत्यादी ठिकाणी बर्‍याच संधी उपलब्ध होऊ शकतात. ‘हेरिटेज’चे काम आंतरराष्ट्रीय पातळीचे असल्यामुळे इंग्रजीबरोबरच फ्रेंच, रशियन किंवा जर्मनसारखी एखादी परदेशी भाषा अवगत असल्यास नोकरीच्या दृष्टीने वाव आणखी वाढू शकतो. युनेस्कोसारख्या संस्थेबरोबर काम करताना करिअरमध्ये खरे तर खूप काही शिकता येते. म्हणूनच तिथे इंटर्नशिपची पण व्यवस्था आहे.

आपल्याकडे उपलब्ध असलेले शिक्षण, आपली आवड आणि भविष्यातील आपले ध्येय हे ठरवूनच मग प्रवेशासाठी अर्ज केलेला चांगला. कारण निवड प्रक्रिया ही कठीण असते. त्यामुळे तुमची प्रचंड आवड, तीव्र इच्छाशक्ती, निष्ठा आणि निवडलेल्या करिअर विषयी उपलब्ध माहिती असलेले विद्यार्थी इन्ट्रन्सशिपसाठी पात्र ठरू शकतात याची कृपया नोंद घ्यावी. युनेस्कोचे भारतातील कार्यालय सफदरजंग, नवी दिल्ली येथे असून, ६६६.४ल्ली२ूङ्म.ङ्म१ॅ या वेब साइटवर लॉग इन केल्यास संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकेल.