आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vina Mhaiskar Article About Grand Maa And Grand Paa

ज्येष्ठ घरी असतील तर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराघरातील ज्येष्ठांनी... घरातल्या इतरांनी...

आपल्याला घरातील सर्व गोष्टी समजल्याच पाहिजे असा आग्रह धरू नये व त्रागा करू नये.
घरातील लोकांनी विचारला तरच सल्ला व तोही थोडक्यात सांगावा. आपण सांगितलेला सल्ला अमलात आणला गेला नाही तर सोडून द्यावे.

संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरावे.
पथ्य पाळावीत. औषधे नियमित घ्यावी.
आमच्या वेळेस असे होते, तसे होते, असे तरुण पिढीसमोर बोलू नये.
आपली करमणूक कशी करून घ्यावी ते आपणच बघावे. सारखे मला करमत नाही, काय करणार, माझा आता उपयोग नाही असे म्हणू नये.

शक्य असेल तेवढी घरातील मंडळींना कामात मदत करावी, त्यांना विचारून व आवडत असेल तरच.
घरातील लहान मुलं, सुना व नातवंडे यांचे चांगल्या गोष्टींसाठी कौतुक करावे. त्यांचा उत्साह वाढेल.
आपण जर अगदी अंथरुणावरच असाल तर घरातल्यांच्या सोईने सर्व करून घ्यावे व भेटायला आलेल्या लोकांना घरातल्यांचाच तक्रारी सांगू नये.

दिवसातला थोडा वेळ तरी जेष्ठांना द्यावा. त्यांची विचारपूस करावी व त्यांचे ऐकून घ्यावे.
बाहेर आपण काय करतो किंवा काय पाहिलं, नवीन काही ऐकलं तर ज्येष्ठांना त्यात रस असल्यास जरूर सांगावे. नव्या पिढीचे अनुभव ऐकायला त्यांना आवडू शकते.
लहान मुलांना मोठ्यांचा आदर कसा करावा ते शिकवावे.

लहान मुलांसमोर मोठ्यांचा अनादर करू नये. किंवा मुलांसमोर मोठ्यांशी मतभेद दाखवू नयेत.
जी मोठ्यांची गोष्ट आपल्याला खटकत असेल ती आपण त्यांना चांगल्या शब्दांत व कोणी समोर नसताना समजावून सांगावी म्हणजे त्यांना अपमान वाटणार नाही.
घरात ज्येष्ठ असतील तर अडचणीचा वेळी त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग होतो व मुलांच्या कानावरही चांगले शब्द पडतात.
घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडे आलेल्या मित्रमंडळींचा आदर ठेवावा, हेटाळणी करू नये.