आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत मूकबधिर चिमुकलीशी अश्लील चाळे; वर्गशिक्षक अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील एका मूकबधिर विद्यालयात शिकणाऱ्या सात वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत वर्गशिक्षकानेच शाळेत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना गुरूवारी (दि. १५) घडली. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच पोलिसांनी शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या नराधम शिक्षकाला अटक केली. दरम्यान, अाराेपीला घेऊन पोलिस शुक्रवारी (दि. १६) न्यायालयात पोहचले असता मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला चाेप दिला. मात्र पाेलिसांच्या हस्तक्षेपामुळे ताे बचावला.

दीपक भाऊरावजी उघडे (४४, रा. अमरावती) असे अाराेपी शिक्षकाचे नाव आहे. दीपक हा शहरातीलच एका मूकबधिर विद्यालयात शिक्षक आहे. दरम्यान, त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मूकबधिर चिमुकलीसोबत त्याने शाळेतच अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरूवारी गणेश विसर्जन असल्यामुळे शाळेत केवळ दोनच िवद्यार्थी आले होते. त्यामध्ये ही पीडित चिमुकली व अन्य एका मुलाचा समावेश होता. शाळेत चार शिक्षक असून,गुरुवारी दीपक एकटाच शाळेत होता. दुपारच्या वेळी त्याने पीडित मुलीला वर्गाबाहेर स्वच्छतागृहाकडे बाेलावून तिच्याशी अश्लील कृत्य केले.

दरम्यान सायंकाळी ही चिमुकली घरी गेली. ती अस्वस्थ असल्याचे अाईने अाेळखले. काही वेळानंतर झालेला प्रकार तिने आईला इशाऱ्यांद्वारे सांगितला. या प्रकारामुळे आईला धक्काच बसला. त्यांनी तातडीने पाेलिसात तक्रार दिली. मात्र चिमकुलीला बोलता येत नसल्यामुळे हा प्रसंग सांगता येत नव्हता. मात्र, चिमुकलीच्या आईने पोलिसांना आपबिती कथन करताच पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचर अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी अाराेपीला काेर्टात नेले, तत्पूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेऊन त्या शिक्षकाला चोप देण्याचा प्रयत्न केला.

दुभाषीच्या मदतीने नोंदवला जबाब
पीडित मुलगी बाेलू शकत नसल्याने पोलिसांना दुभाषीच्या मदतीने तिची तक्रार समजून घेतली. तिच्या शाळेतील एका महिला शिक्षकाने दुभाषीची भूमिका बजावली. त्या शिक्षिकेने चिमुकलीच्या इशाऱ्यांवरून तिचे म्हणणे मांडले व पाेलिसांनी जबाब नांेदवून घेतला.
बातम्या आणखी आहेत...