आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह जाहिरातींच्या विरोधात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोरांच्या शाळा सुरू होणार म्हणून गणवेश आणायला दुकानात जायचे ठरले. कापड बाजारात पाऊल ठेवले आणि गर्दीत सापडले. दोन्ही बाजूंनी दुकानांमध्ये गर्दी आणि समोर महिलांचे पुतळे आणि त्यावर वेगवेगळे कपडे! त्यात अंतर्वस्त्रांपासून सर्व वस्त्रांचा डिस्प्ले! थ्रीपीस, जीन्स, जर्सी, सलवार कमीज, साधा गाउन, नाइटी आणि बरेच काही. अशा प्रकारे महिलांचा मांडलेला बाजार पाहून मन विषण्ण झाले. महिलांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा 1986मध्ये मंजूर करण्यात आला असून त्याचा मुख्य उद्देश जाहिरातींसाठी महिलांचे अश्लील आणि लाजिरवाण्या पद्धतीने केलेल्या सादरीकरण्यास आळा घालणे अथवा प्रतिबंध घालणे हा आहे.
आपले उत्पादन सामान्य माणसांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने सर्वच उत्पादक प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे! आज बाजारात उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त वस्तू बाजारात येण्याआधी जाहिरातींद्वारे सामान्यांपर्यंत पोहोचतात. जाहिरातींमध्ये महिलांच्या प्रतिमेचा वापर सर्रास आणि अनेकदा अतिशय भडक, अश्लीलतेकडे झुकणारा असतो. अनेक गोष्टी ज्या चार भिंतींच्या आड व्हायच्या त्या सर्व उघड करणारा असतो. सॅनिटरी नॅपकिन्सपासून गर्भनिरोधक गोळ्या किंवा काँडोम्सच्याही जाहिराती ठिकठिकाणी झळकू लागल्यात आणि टीव्हीमुळे घराघरात पोहोचल्यात. उत्पादनाचा जाहिरातींद्वारे खप वाढवणे चूक नाही; पण त्याकरिता स्त्रीदेहाचा वापर अतिशय आक्षेपार्ह आहे. स्त्रीदेह, प्रतिकृती किंवा त्यांच्या कोणत्याही भागाच्या सादरीकरणामुळे जर स्त्रीप्रतिमेची अवहेलना होत असेल किंवा त्यामुळे समाजातील नीतिमत्तेचे आणि जीवनमूल्याचे हनन होत असेल तर अशा प्रकारच्या सादरीकरणास कायद्याने प्रतिबंध आहे. कुठल्याही जाहिराती, प्रकाशने किंवा वेष्टणे यावर स्त्रीदेहाचे अयोग्य पद्धतीने प्रदर्शन करण्यास बंदी आहे. अशी पुस्तके की ज्यात स्त्रीदेहाचे प्रदर्शन केले आहे, त्यांचे उत्पादन आणि विकी करणे हा गुन्हा आहे. विक्रीकरिता वस्तूंवरचा स्त्रीदेहाचा वापर अश्लील किंवा गलिच्छ पद्धतीने केला असेल तर तो गुन्हा ठरतो आणि गुन्हा करणार्‍या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड ही शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा त्याच्याकडून पुन्हा पुन्हा होत असल्यास पाच वर्षांपर्यंतची कैद व एक लाख रुपयांपर्यंत दंड सुचवलेला आहे. अशा गुन्ह्यांची तक्रार कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात किंवा त्या क्षेत्रातील पोलिस ठाण्यात करता येते. अशा तर्‍हेने रोज आपल्या आजूबाजूला विविध माध्यमांमधून होणारी स्त्रीदेहाची विटंबना थांबवण्याचा विडा आम्ही भगिनींनीच सजगतेने उचलावयास हवा.
nbtlawcollege@rediffmail.com