आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनीण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(पूर्वी लग्नात विहीण म्हणत असत, जमाना बदलला. आता सुनीण म्हणूया)

ओटीत घे आम्हा प्रेमाने सुनबाई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी॥
सुनवासाची गं माय तुझी, तू जाणून सारे आहे
तू नकोस तैशी वागवूस आम्हाला
मी पदर पसरते नवर्‍याची गं आई
सांभाळ करावा...
तू ड्रेस घाल, तू जीनपँटही घाली
तू पिझ्झा बर्गर चिकन तंदुरी खाई
तू जिमात जा गं पार्लरास तू जाई
सांभाळ करावा...
ते आॅफिस तुझे तो लॅपटॉप
तो मेल मी जाणून आहे
या घरात आता ‘सत्यम’चे ते
आॅफिस थाटले आहे
मी पाकगृहाच्या सदैव राहीन ठायी
सांभाळ करावा...
सासरे तुझे गं गुमान करतील कामे
अन् जातील बँका, भरतील वीज बिल ते
मी सांभाळीन गं तुझ्या मुला प्रेमाने
तू मम पुत्राची तशीच चिंता वाही
सांभाळ करावा...
तू नाहीस म्हणले आम्हास बाबा-आई
परि नको ‘डस्टबिन’ म्हणू कधी गं बाई
नात्याची पटण्या ओळख या गं करू नको तू घाई
सांभाळ करावा...
आम्ही थकलो आता, मुरड मना तरी घालू
तव नव्या पिढीशी जुळवून सारे घेऊ
ना जमला देणे मान तरी, अवमान न आमुचा होई
सांभाळ करावा...