आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Does The Common Muslim Woman Feel About Triple Talaq?

तोंडी तलाकची टांगती तलवार नकोच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वेळा तलाक म्हणून घराबाहेर काढण्यात आल्यानंतर शायरा बानू यांनी थेट या कृतीची संविधानिक वैधताच काय असा प्रश्न विचारण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्र सरकारला बाजू मांडण्यासाठी मुदत दिली आहे. मुस्लिम महिलांना याविषयी काय वाटतं, ते जाणून घेऊया आजच्या कव्हर स्टोरीत.

मुंबईत एका कंपनीत काम करणारी इम्राना. पाच बहिणींमधली चौथी. मोठ्या तिघी विवाहित. इम्रानाला विचारलं तलाकबद्दल, तर म्हणाली, ये तो सरासर
गलत है. बायकोला असा तो एका शब्दात कसा तलाक देऊ शकतो? दोघं समान आहेत, त्यांना समान अधिकार असायला हवेत. तिला तिचं म्हणणं काय आहे, ते मांडता यायला हवंच.
इम्रानाला विचारलं, समजा, तुझं लग्न झाल्यानंतर नवऱ्याने तुला असा त्रिवार तलाक दिला तर तू काय करशील?
मी गप्प नाही बसणार. महिला संघटनांकडे जाईन, कोर्टात जाईन, भांडेन. तो केवळ त्याला नको म्हणून आमचं नातं तोडू शकणार नाही.
इम्राना इतक्या तळमळीने बोलतेय कारण तिच्या तिसऱ्या बहिणीला नुकतीच नवऱ्याने एकदा तलाक म्हणून धमकी दिलेली आहे. नवराबायकोत काही भांडण झालं, तो तलाक म्हणाला आणि त्याने त्याच्या आईवडिलांना हे सांगितलंही. बहिणीचे सासूसासरे इम्रानाच्या आईवडिलांना फोन करून धमकावू लागल्यावर इम्रानाच्या आईने त्यांच्या जवळच्या महिला संघटनेकडे तक्रार केली. त्या संघटनेकडून सासऱ्यांना फोन गेल्यावर ते सध्या गप्प आहेत, पण एकदा तलाक म्हटल्याने तिच्या बहिणीलाही असं वाटतंय की, आपल्याकडे आता दोनच संधी आहेत. शिवाय तिला तिच्या चार वर्षांच्या मुलीची काळजी वाटते. इम्रानाच्या आईवडिलांना इम्राना आणि तिच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाची काळजी वाटतेय.
इम्राना म्हणते, तलाक देताना या पुरुषांना धर्म जवळचा वाटतो, पण मग एरवी ते धर्माला अनुसरून का वागत नाहीत?
मुलगी आपले आईवडील आणि कुटुंब सोडून सासरी येते. तेव्हा तिला सासरच्या मंडळीकडून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा मिळायला हवा. परंतु काही प्रकरणात महिलांना छळ सहन करावा लागतो. तसेच तलाक, तलाक, तलाक या तीन शब्दांची तलवार तिच्या डोक्यावर टांगती असल्याने ती सर्व निमूटपणे सहन करत राहते. काळ झपाट्याने बदलतो आहे, त्यानुसार समाजानेही बदलले पाहिजे. अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांवर आजही अनेक बंधने लादलेली दिसतात. मुस्लिम समाजात पुरुषांना जसे सर्व अधिकार आहेत, तसे सर्व अधिकार महिलांना मिळायला हवेत. भावना आणि प्रेमाचे नाते फक्त तलाक या शब्दामुळे तुटत असेल, तर येणाऱ्या काळात मुली लग्न करायला तयार होणार नाहीत, अशी भीती सिमरन यांना वाटते.
पुढील स्लाइडमध्ये,
>> औरंगाबादेतील मुख्याध्यापक रुबी यांचे मत
>> हीन वागणूक; पुरुषांची मानसिकता