आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लठ्ठपणा म्हणजे नेमके काय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जेव्हा सेवन करण्यात येते तेव्हा त्याचे रूपांतर चरबीत होते. सुरुवातीला चरबीच्या पेशी आकाराने वाढतात. जेव्हा आकाराची मर्यादा संपते, त्यानंतर दुस-या पेशी तयार होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे चरबीच्या पेशी वाढत जातात व स्थूलपणा येतो. जेव्हा वजन कमी होते. त्या वेळेस चरबीच्या पेशींचा आकार कमी होतो. पण संख्या कमी नाही होत.
’ लठ्ठपणाची मुख्य कारणे काय आहेत : 1. शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती कॅलरीजपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठवून राहतात व लठ्ठपणास सुरुवात होते. बैठे काम करणा-या लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त आढळून येतो.
2. आनुवंशिकता हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे
3. थॉयरॉइडच्या आजारामुळे, विशेषत: हायपोथॉयरॉडिझममुळे वजन वाढतेय.
4. इन्सुलिनोमा ज्या रुग्णामधील रक्तातील साखरेचे प्रमाण नेहमी कमी होते (हायपोग्लायसेमिया) अशा रुग्णांना वारंवार खावे लागते त्यामुळेही वजन वाढते. 5. मानसिक आजार : विशेषत: डिप्रेशन असणा-या रुग्णांना वारंवार जेवण्याची सवय असते. त्यामुळेही वजन वाढते.
6. गरोदरपणा : स्त्रियांमध्ये गरोदरपणात व नंतर 8 ते 10 किलो वजन वाढते व ते नंतर कंट्रोल न केल्यास तसेच राहते.
7. पॉलिसायस्टिक ओव्हरीन डिसीझ.
8. मेडिकेशन -स्टेरॉइड, अँटी डीप्रेसंट, ओ.सी.पी. अशा गोळ्यांमुळे वजन वाढते.
 लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास काय दुष्परिणाम होतात : - ब्लड प्रेशर (रक्तदाबाचा त्रास), डायबेटीस (मधुमेह) जसे आयुष्यभर राहतात तसेच लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास तोही आयुष्यभराचा सोबती होऊन बसतो. खालील लांबलचक यादी ही दुष्परिणामांची आहे. 1. दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. 2.थकवा लवकर येणे. 3. दिवसभर सुस्तपणा, कामात उत्साह न वाटणे 4. श्वास घेण्यास त्रास होणे. 5. घोरणे. 6. डायबेटीस 7. हायपरटेन्शन 8. गुडघ्यावर अतिरिक्त भारामुळे गुडघेदुखी 9. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे. 10. वंध्यत्व 11. अनियमित मासिक पाळी 12. पित्ताशयातील खडे 13. तळहात तळपायाची आग होणे व मुंग्या येणे.
लठ्ठपणातील आहार कसा असावा : काही सोपे उपाय आहेत. ज्यांनी चांगला फायदा होतो. एकाच वेळी पोटभर जेवणे टाळावे. उदा : जर तुम्ही सकाळी व संध्याकाळी मिळून 4 पोळ्या खात असाल तर त्या 4 पोळ्या विभागून खाव्यात. रात्रीचे जेवण थोडे हलके घ्यावे. जेवणानंतर एक तास आडवे पडू नये.
 हे पदार्थ टाळावेत : - तेलकट, तुपकट, शिळे जेवण, बटाटा, भात, दुधाचे पदार्थ (पनीर, बटर, चीज) नॉन व्हेज.
 या पदार्थांचे सेवन वाढवावे : - सलाड (काकडी, टोमॅटो, बीट, मुळा) कडधान्ये (मूग, मटकी, चवळी) भाज्यांचे सूप
व्यायाम काय काय करावा : सर्वात सोपा परवडणारा आणि अतिशय परिणामकारक व्यायाम म्हणजे (ब्रिस्क वॉकिंग) म्हणजे वेगाने चालणे, जेणेकरुन घाम आला पाहिजे. रोज कमीत कमी 40 मिनिटे ब्रिस्क वॉक घेतला पाहिजे. घाम येणे म्हणजे शरीरातील चरबी (फॅट) जळणे. जितका जास्त घाम येईल तितके चांगले. शक्य असल्यास जिम जॉइन करण्यास हरकत नाही. पण नियमितता असावी व व्यावसायिक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. लठ्ठपणा हा ऐकण्यास जितका साधा सरळ वाटतो तितकाच तापदायक. वेळीच उपाय न केल्यास गंभीर स्वरूपाचे परिणाम दिसून येतात. शेवटी आपल्या तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे.