Home | Magazine | Kimaya | what is meant by pixel

पिक्सल म्हणजे काय ?

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 06, 2012, 10:21 PM IST

एखादे चित्र किंवा फोटो खूप छोट्या बिंदूंपासून बनलेला असतो. कॉम्प्युटरपासून ते सर्व उपकरणांत दिसणारी छायाचित्रे अशाच पिक्सलपासून बनतात.

  • what is meant by pixel

    तुम्ही जेव्हा एखादा फोटो पाहता, तेव्हा असे वाटते की तो एकाच भागात बनलेला आहे. पण तसे नसते. एखादे चित्र किंवा फोटो खूप छोट्या बिंदूंपासून बनलेला असतो. कॉम्प्युटरपासून ते सर्व उपकरणांत दिसणारी छायाचित्रे अशाच पिक्सलपासून बनतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी की, पिक्सल म्हणजे कोणत्याही फोटोला मोजण्याची प्रक्रिया नव्हे. पण आता अनेक वेळा कॅमेर्‍यासोबत पिक्सल्स दिले जातात. थोडक्यात, या छायाचित्रात जितके जास्त पिक्सल तितका तो फोटो स्पष्ट असतो. कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर किंवा टीव्ही स्क्रीनवर कोणतीही फोटो लाखो पिक्सल्सपासून बनलेली असते. प्रत्येक पिक्सल आठ किंवा त्याच्या पटीत रंगग्रहण करतो. जर पिक्सलमध्ये 24 बिट्स असतील तर तो जास्तीत जास्त 16 लाख रंग दाखवू शकतो. असे मानले जाते की, पिक्सल कोणत्याही फोटोचा छोटा हिस्सा असतो. पण पिक्सलसुद्धा अनेक छोट्या घटकांपासून बनलेले असतात. मॉनिटरचा पिक्सल लाल, हिरवा आणि गडद जांभळा या तीन रंगांच्या बिंदूपासून बनलेला असतो. हे तिन्ही रंग कोणत्याही पिक्सलमध्ये पूर्णपणे मिसळलेले असतात. डिजिटल कॅमेर्‍यासाठी मेगापिक्सल शब्द वापरला जातो. हा पिक्सलपेक्षाही छोटा भाग आहे. मेगापिक्सल्स कॅमेर्‍यास उत्कृष्ट मानले जाते.

Trending