Home »Magazine »Niramay» What Is The Kidney Stone

किडनी स्टोन म्हणजे काय?

डॉ. प्रमोद हंडीबाग, | Mar 20, 2017, 02:23 AM IST

किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो.
लक्षणे :किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या कापल्यागत तीव्र वेदना असणे, मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे. प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास व लघवीमध्ये रक्त तसेच जेलीयुक्त घटक पडतात. गंभीर अवस्थेत गडद रंगाची, गढूळ व मंदप्रवाही लघवी असते.
तपासणी : एखाद्या आजाराचे निदान कळण्यासाठी तपासण्या गरजेच्या असतात. आर.एफ.टी. ही तपासणी किडनीची कार्यक्षमता पाहण्यासाठी रक्ताद्वारे केली जाते. मूत्रातील जंतुसंसर्ग बघण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते. किडनी स्टोनचा आकार, स्थान तसेच किडनीच्या रचनेतील बदल पाहाण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करणे महत्त्वाचे आहे. तसेच गरजेनुसार एक्सरे, आय.व्ही.पी. सिटीस्कॅन, रिनल बायॉप्सी इत्यादी
किडनीमध्ये इन्फेक्शन :या इन्फेक्शनला पायलोनेफ्रायटिस असे म्हणतात. हे इन्फेक्शन किडनी स्टोन मूळे होऊ शकते. यात लघवी किडनीच्या बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि लघवी पुन्हा किडनीत जमा होते. यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शनचा धोका वाढतो. तसे तर किडनी व मूत्रमार्गाचे इन्फेक्शन व मूत्रमार्गाचे इन्फेक्शन इ-कोलाई आणि अन्य बॅक्टेरियामुळे होते. इ-कोलाई इन्फेक्शन दूषित पाणी आणि अन्नापासून होते.
किडनी स्टोन आणि होमिओपॅथी :होमिओपॅथीत किडनीस्टोन या आजारावर प्रतिबंधात्मक व प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. कोणतेही तज्ज्ञ व होमिओपॅथ आपल्याकडे आलेल्या रूग्णाचं व्यक्तित्व व आजाराची लक्षणे खोलात जाणून घेतल्याशिवाय उपचार करत नाही. सर्वासाठी एकच औषध, असे होमिओपॅथीमध्ये नसते.
आजार किंवा विकार मुळातून बरे करायचे असतील तर वेगवेगळया व्यक्तींना त्यांच्या सवयी, आहार, स्वभाव त्यानुसार वेगळेच उपचार करावे लागतात. शरीरांतर्गंत असणारी वेगवेगळी जैव रसायने आणि त्याच्या रूग्णाच्या शरीर मन स्वास्थावर परिणाम हे दोन्ही सांभाळले जाते. अशा रितीने शस्त्रक्रियेविना दुष्परिणामही हाेतात. प्रतिबंधात्मक व प्रभावी किडनी स्टोनवरील होमिआेपॅथिक औषधोपचार अनेक रुग्णांना फायदेशीर ठरत आहेत.

आजार व औषधोपचार : आजारावर मात करण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी, तो पुन्हा न होऊ देण्यासाठी, त्यातून पुढे गुंतागुंत निर्माण न होऊ देण्यासाठी योग्यवेळी योग्य ते निदान व औषधोपचार अतिशय महत्त्वाचे असतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे गरजेचे अाहे.
डॉ. प्रमोद हंडीबाग,
किडनीस्टोन व होमिओपॅथी तज्ज्ञ, अंबाजोगाई

Next Article

Recommended