आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम डी आर टीबी, टी डी आर टीबी म्हणजे काय?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपण वर्तमान पत्रात वाचले असेल की टीडीआर टीबीचे रुग्ण अद्याप मुंबईत आढळत नाहीत; परंतु एमडीआर टीबी, एक्सडीआर टीबीच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या क्षयरोगाच्या स्वरूपात बराच फरक पडत आहे. शासनापुढे क्षयरोग नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शासनाने डॉट्स (dots) च्या बरोबरीने राष्‍ट्रीय क्षयरोग नियंत्रण उपक्रमाअंतर्गत (dots plus) डॉट्स प्लस म्हणचे एमडीआर टीबीच्या रुग्णांसाठी उपचार पद्धती सुरू केली आहे, पण हे mdr-tb, tdr-tb किंवा xdr-tb म्हणजे नक्की काय?


mdr-tb, tdr-tb व xdr-tb हे क्षयरोगाचे-टीबीचे वेगळे व विशिष्ट प्रकार आहेत. dr म्हणजे ड्रग रेझिस्टंट म्हणजेच औषधांना प्रतिसाद न देणारा आजार. mdr म्हणजे multi drug resistant म्हणजे क्षयरोगासाठी वापरण्यात येणा-या आपसोनियाझइड व रिफॅपिझीन (h U r) या दोन्ही औषधे व त्यापेक्षा जास्त औषधांना प्रतिसाद न देणारा क्षयरोग. xdr म्हणजे xdr मधील सर्व औषधे व इतर दुय्यम औषधांना प्रतिसाद न देणारा टीबी तर X tdr-tb म्हणजे क्षयरोगात वापरण्यात येणा-या सर्व प्रकारच्या औषधांना प्रतिसाद न देणारा टीबी. थोडक्यात क्षयरोगावर वापरण्यात येणा-या किंवा औषधांना प्रतिसाद न देणारा टीबी.


mdr-tb, tdr-tb होण्याची कारणे :
क्षयरोगाचा उपचार हा जास्त कालावधीचा म्हणजे 6-9 महिन्याचा असतो; परंतु रुग्ण सुरुवातीस 1-2 महिने औषधे घेतात व काही दिवसांनी औषध घेण्याचे सोडून देतात; परंतु आजार उद्भवला की थोडे महिने औषध घेतात व सोडतात.अशा प्रकारे औषधांची धर-सोड प्रकारामुळे त्यांचे आजारांचे जंतू कडक होतात व नेहमीच्या औषधांना प्रतिसाद देत नाही.


चुकीची औषधे घेतल्यामुळे क्षयरोगावर कमीत कमी 4-5 औषधे सुरुवातीस घ्यावी लागतात, पण काही डॉक्टर रुग्णांना फक्त 1-2 प्रकारच्याच गोळ्या (monotherapy)देतात व त्यामुळे mdr-tb आजार होऊ शकतो.
टीबीचा आजार करणा-या जीवाणूमध्ये genetic mutation म्हणजे genetic उत्परिवर्तन होते, त्यामुळे टीबीच्या औषधांना दाद न देणारा क्षयरोग होऊ शकतो.


कमी गुणवत्तेची औषधे घेतल्यामुळे काही रुग्णांना क्षयरोगावरील औषधेच कमी प्रतीची -गुणवत्तेची दिली जातात. त्यामुळे देखील mdr-tb आजार होऊ शकतो.


प्रतिकार शक्ती कमी झाल्यास hiv म्हणजे ह्युमन इम्यूनो डिफिसियन्सी व्हायरस या आजारांना तसेच दीर्घकाळाचे आजार जसे मधूमेह, क्रॉनिक बॉयकाटीस व धूम्रपान करणारे तसेच कॅन्सर सारख्या आजारावर दीर्घ काळ स्टिरॉइडसारखे औषध घेणा-या रुग्णांची प्रतिकार शक्ती बरीच कमी होते. अशा रुग्णांना जर क्षयरोगाचे इन्फेक्शन झाले तर ते कदाचित mdr-tbचे इन्फेक्शन होऊ शकते.


mdr-tb, tdr-tb ची लक्षणे :
टीबीच्या रोगाप्रमाणेच पुढील गोष्टींचा त्रास होतो. वारंवार खोकला, खोकल्यातून कफ पडतो,काहींना रक्तदेखील पडते. ताप येतो. विशेषत: तो सध्याकाळी रात्री जास्त येतो. भूक मंदावते, वजन कमी होते.


छातीचा टीबी सोडून इतर अवयवांचा म्हणजे पोटाचा, मेंदूचा, गळ्याभोवतीगाठी येण्याचादेखील आजार होऊ शकतो. अशा रुग्णांची सविस्तर माहिती घेतली तर असे लक्षात येते या रुग्णांनी प्रथम काही दिवस टीबीचे औषधे घेतलेली असतात; पण काही कारणांनी तो औषधोपचार बंद करून टाकतात. अशा वेळी mdr-tb,tdr-tb झाला असावा, असे गृहीत धरावे.


mdr-tb,tdr-tb चे निदान :
अशा प्रकारच्या टीबीचे निदान करण्यासाठी थुंकीची विशिष्ट अशी तपासणी केली जाते. तपासणीला म्हणजे ‘ड्रग सेन्सिटिव्हिटी व कल्चर’ असे म्हटले जाते. ही तपासणी शासनाने मान्य केलेल्या लॅबोरेटरीत सध्या नागपूर, पुणे, मुंबईमध्ये मोफत केली जाते. खासगीतील तपासणीसाठी यास हजारो रुपये व वेळदेखील 2-3 महिने लागेल.


mdr-tb, tdr-tb ची उपचार प्रणाली-
(cat-regime) या प्रकारच्या क्षयरोगात टीबीची दुय्यम दर्जाची औषधे (second line of tb drugs) रोज व 24 ते 27 महिने दिली जातात. तपासणीच्या रिपोर्टनुसार व रुग्णाला जर इतर कोणता आजार असल्यास ते सर्व विचारात घेऊन त्याच्या वजनानुसार उदा. इंजे-कॅनामायसिन, इथिओनामाइड, 6 ते 7 प्रकारची औषधे दिली जातात. mdr-tb, tdr-tb न होण्यासाठी उपाय-
mdr-tb,tdr-tb ची अशी क्लिष्ट उपचार पद्धती पाहिल्यानंतर आपणास नक्कीच वाटेल की अशा प्रकारचा आजार होऊ नये. हा आजार माणसानेच निर्माण केला आहे व त्यामुळे त्याच्याच हातात न होण्याचा उपाय आहे. तो उपाय म्हणजे - टीबी आजाराचे लवकरात लवकर निदान करणे- जर व्यक्तीला 1-2 आठवडे सातत्याने खोकला येत असेल व बेडका पडत असेल तर त्याने त्वरित सरकारी किंवा खासगी लॅबमध्ये आपल्या बेडक्याची तपासणी करून घ्यावी.
मधूमेह, खूप दिवस स्टिरॉइडच्या गोळ्या घेणारे तसेच धूम्रपान, व्यसन असणा-या रुग्णांनी त्यांच्या थुकीची तपासणी त्वरित करावी. निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्वरित टीबीचा औषधोपचार सुरू करावा.

औषधोपचारामध्येच खंडित न करता संपूर्ण करावा. औषधोपचार चालू असताना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वेळच्या वेळी थुंकीची तपासणी करावी. रुग्णाने आपल्या मनाने औषधे बंद करू नये व टीबीचे एकच औषध घेऊ नये.
योग्य सकस आहार, नियमित व्यायाम व हवेशीर खोलीत राहावे व आपली प्रतिकार शक्ती वाढवावी.
धूम्रपान व इतर व्यसनाच्या आहारी जाऊ नये. वर सांगितल्याप्रमाणे व्यक्तीने नियमांचे पालन केले तर mdr-tb, tdr-tb च होणार नाही. त्यामुळे सांगावसे वाटते की खूप दिवसांपासून ओळखल्या जाणा-या टीबीकडे दुर्लक्ष करू नका.